शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

Google Payमध्ये आला नवा बग, आपोआप डिलीट होतायत बँक खाती

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2020 8:58 PM

डिजिटल पेमेंटसाठी भारतात मोठ्या प्रमाणात गुगल पे हे अ‍ॅप वापरलं जातं.

नवी दिल्लीः डिजिटल पेमेंटसाठी भारतात मोठ्या प्रमाणात गुगल पे हे अ‍ॅप वापरलं जातं. पण या गुगल पे अ‍ॅपमध्येही एक बग आलेला आहे. त्यामुळे बँक खातं आपोआप डिलीट होत आहे. गुगल पेच्या या बगमुळे पैसे पाठवणं आणि मिळवण्यात अडचणी येत आहेत. अनेकांनी ट्विटरच्या माध्यमातून याची तक्रार केली आहे. ट्विटरच्या तक्रारीनुसार, अनेक लोकांना गुगल पे अ‍ॅपमध्ये बँक खातं दिसत नाही आहे. त्यामुळे गुगल पे अ‍ॅप पुन्हा एकदा बँक खातं लिंक करण्यास सांगत आहे. विशेष म्हणजे ज्या लोकांनी तक्रार केल्या आहेत, त्यातील जास्त करून लोकांचं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खाती आहेत. परंतु ही समस्या फक्त अँड्रॉइडच्या एका विशिष्ट व्हर्जनमध्ये येते आहे की आयफोनमध्ये अशा तक्रारी आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. आयफोन तपासल्यानंतर त्यात कोणतीही त्रुटी नसल्याचं आढळून आलं आहे. या बगला आता फिक्स्ड करण्यात आलं आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये भारतातल्या गुगल पे युजर्सची संख्या 6.7 कोटींच्या घरात पोहोचली होती. भारतात गुगल पेनं फोन पेला मागे टाकलं आहे. गुगल पेवरून भारतात दरवर्षी जवळपास 7,82,800 कोटी रुपयांचे व्यवहार होतात. 

टॅग्स :google payगुगल पे