Google Pay आता झाले आणखी जास्त सुरक्षित!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2019 18:27 IST2019-10-29T18:23:34+5:302019-10-29T18:27:40+5:30
Google Pay किंवा G-Pay च्या जुन्या व्हर्जनमध्ये ग्राहकांना पिनच्या माध्यमातून सुरक्षित ट्रान्जक्शन करत होते.

Google Pay आता झाले आणखी जास्त सुरक्षित!
नवी दिल्ली : UPI पेमेंट करण्यासाठी वापरण्यात येणारे Google Pay अॅप आता आणखीनच सुरक्षित करण्यात आले आहे. या अॅपमध्ये बायोमॅट्रिक ऑथेंटिकेशन फीचर आणले आहे. त्यामुळे Google Pay अॅपवरून आता कोणतेही डिजिटल व्यवहार करताना ग्राहक बायोमॅट्रिक ऑथेंटिकेशन फीचरचा वापर करू शकतात. या नवीन फीचरला 2.100 व्हर्जनसोबत रोल आऊट केला आहे.
गूगलने आपल्या या बायोमॅट्रिक सिक्युरिटी सिस्टमला अँड्रॉईड 10 ऑपरेटिंग सिस्टमसोबत रोल आऊट केले आहे. या नवीन फीचरच्या माध्यमातून ग्राहक कोणतेही ऑनलाइन ट्रान्जक्शन हे फिंगरप्रिंट आणि फेशियल रिकॉग्निशन सिस्टमच्या माध्यमातून प्रोटेक्ट करू शकतात.
Google Pay किंवा G-Pay च्या जुन्या व्हर्जनमध्ये ग्राहकांना पिनच्या माध्यमातून सुरक्षित ट्रान्जक्शन करत होते. मात्र, आता नव्या फीचर्सनुसार ग्राहक पिन वापराशिवाय बायोमॅट्रिकच्या माध्यमातून ट्रान्जक्शन करू शकणार आहेत. हे फीचर सध्या अँड्रॉईड 10 डिव्हाईससाठी रोल आऊट केला आहे. लवकरच या फीचर्सला अँड्राईड 9 पाय डिव्हाईसेससाठी सुद्धा रोल आऊट करण्यात आला आहे.
नवीन फीचर Google Pay अॅपच्या सेंडिग मनी सेक्शनध्ये ग्राहकांना दिसेल. तसेच, याठिकाणी बायोमॅट्रिकच्या माध्यामातून सिक्युअर करण्याचा ऑप्शन मिळेल. हे फीचर फक्त पैसे ट्रान्सफर करण्यासाठी करता येणार आहे. NFC पेमेंट्ससाठी ग्राहकांना पिनमार्फत व्हेरिफाय करावे लागणार आहे.