शहरं
Join us  
Trending Stories
1
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
2
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
4
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
5
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
6
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
7
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
8
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
9
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
10
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
11
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
12
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
13
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
14
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
15
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
16
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
17
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
18
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
19
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
20
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...

हायस्पीड इंटरनेटसाठी Elon Musk ची Google सोबत डील; मुकेश अंबानींच्या Jio ला जोरदार टक्कर देण्याची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2021 16:11 IST

Google partners with Elon Musk’s SpaceX : स्पीड वाढविण्यासाठी एलन मस्क यांनी गुगल (Google) सह भागीदारी केली आहे.

नवी दिल्ली - एलन मस्क (Elon Musk) हे सध्या हाय स्पीड इंटरनेट सेवा प्रदान करण्याच्या दिशेने वेगाने काम करत आहे. स्पीड वाढविण्यासाठी एलन मस्क यांनी गुगल (Google) सह भागीदारी केली आहे. गुगलने याबाबतची मोठी घोषणा केली आहे. या भागीदारी अंतर्गत, स्टारलिंक सॅटालाईट (Starlink Satelite) Google द्वारे संगणकीय आणि नेटवर्क संसाधने प्रदान केली जाईल. SpaceX गुगल डेटा सेंटरमध्ये एक ग्राऊंड स्टेशन स्थापित करेल, जे SpaceX उपग्रहाशी जोडले जाईल. येत्या काही दिवसांत जगातील अनेक भागात हाय स्पीड इंटरनेट उपलब्ध होईल.

Reliance Jio ला बसू शकतो मोठा धक्का 

हायस्पीड इंटरनेटसाठी एलन मस्क यांनी Google सोबत डील केलं असल्याने मुकेश अंबानींच्या Jio ला जोरदार टक्कर देण्याची तयारी सुरू झाली आहे. भारताबाबत सांगायचं झालं तर हाय-स्पीड इंटरनेटमुळे रिलायन्स जिओला (Reliance Jio) यामुळे मोठा धक्का बसू शकतो. जिओ ही भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. कंपनीचे 40 कोटीहून अधिक ग्राहक आहेत. तसेच Jio 5G लॉन्चच्या तयारीत आहे. रिलायन्स जिओचे वर्चस्व असलेल्या विभागात मस्ककडून उपग्रह आधारित हायस्पीड इंटरनेट सेवा देण्याचे काम केले जात आहे. यासाठी पूर्व नोंदणी देखील सुरू झाली आहे. तसेच या वर्षाच्या अखेरीस भारतात लॉन्च केली जाऊ शकते. 

काय आहे डिल ?

एलन मस्क यांनी गुगलशी केलेल्या डिलमध्ये स्पेसएक्सच्यावतीने गुगल डेटा सेंटर प्रॉपर्टीजच्या माध्यमातून Starlink ग्राउंड स्टेशनचा शोध घेणार आहे. गुगल क्लाऊडच्या कक्षेत येत्या काही दिवसांत 1500 स्टारलिंक उपग्रह प्रक्षेपित करण्याची योजना आहे . विशेष म्हणजे यामुळे युजर्सना कोणत्याही अडचणींशिवाय हाय स्पीड इंटरनेटचा आनंद घेता येणार आहे. यामध्ये ग्लोबल ऑर्गनायझेशनच्या सहकार्याने एक सुरक्षित कनेक्शन पायाभूत सुविधा तयार केली गेली आहे. स्टारलिंक प्रकल्प उपग्रह आधारित इंटरनेट प्रदाता कंपनी आहे. त्याच्या मदतीने, स्टारलिंक जगातील कोणत्याही भागात हाय-स्पीड इंटरनेट सेवा वितरित करण्यात सक्षम आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, सध्या स्टारलिंकचे जगभरात 10,000 हून अधिक सक्रिय युजर्स आहेत.

कोरोनाशी लढण्यासाठी Twitter चा पुढाकार; तब्बल 110 कोटींची केली मदत

कोरोनाशी लढण्यासाठी आता ट्विटरने (Twitter) देखील भारताला मदतीचा हात दिला आहे. मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरने कोरोनाशी लढण्यासाठी पुढाकार घेतला आहे. ट्विटरने 15 मिलियन डॉलर्स म्हणजेच 110 कोटींची मदत जाहीर केली आहे. ट्विटरचे सीईओ जॅक पॅट्रिक डोर्सी यांनी सोमवारी ट्विट करून याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. "ही रक्कम केअर (CARE), एड इंडिया (Aid India) आणि सेवा इंटरनेशनल यूएसए (Sewa Internationa USA) या तीन संस्थांना दान करण्यात आली आहे. यामध्ये केअरला 1 कोटी डॉलर्स तर एड इंडिया आणि सेवा इंटरनॅशनल यूएसएला अडीच मिलियन डॉलर्स देण्यात आले आहेत" असं म्हटलं आहे. ट्विटरने आपल्या निवेदनात दिलेल्या माहितीनुसार, सेवा आंतरराष्ट्रीय ही हिंदू विश्वास-आधारित, मानवतावादी, ना-नफा सेवा संस्था आहे. हे ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर, व्हेंटिलेटर, बीआयपीएपी (बिलीवेल पॉझिटिव्ह एअरवे प्रेशर) आणि सीपीएपी (सतत पॉझिटिव्ह एअरवे प्रेशर) मशीन सारख्या जीवनरक्षक उपकरणांच्या खरेदीसाठी मदत करणार आहे. 

टेक, गॅजेटच्या लेटेस्ट बातम्यांसाठी इथे क्लिक करा....

https://www.lokmat.com/tech/

 

टॅग्स :Reliance Jioरिलायन्स जिओMukesh Ambaniमुकेश अंबानीIndiaभारतJioजिओtechnologyतंत्रज्ञानInternetइंटरनेट