गुगलने AI-पावर्ड फायरसॅट उपग्रह लाँच केला, जंगलातील आग नियंत्रित करण्यास मदत करणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 20:31 IST2025-03-18T20:30:43+5:302025-03-18T20:31:26+5:30
गुगलने स्पेसएक्सच्या प्रक्षेपण व्हेईकलमधून एआय-पावर्ड उपग्रह फायरसॅट प्रक्षेपित केला आहे. यामुळे सरकारी संस्थांना जंगलातील आगींना आळा घालण्यास मदत होणार आहे.

गुगलने AI-पावर्ड फायरसॅट उपग्रह लाँच केला, जंगलातील आग नियंत्रित करण्यास मदत करणार
आपल्याकडे जंगलात आगी लागण्याच्या घटना घडत असतात. आता गुगलने यावर एक मोठा पर्याय आणला आहे. गुगलने पसरणाऱ्या वणव्यांशी लढण्यासाठी फायरसॅट हा एआय- पावर्ड उपग्रह प्रक्षेपित केला आहे. आग पसरू नये म्हणून हा उपग्रह वेळेवर इशारा देईल. एलॉन मस्क यांच्या कंपनी स्पेसएक्सच्या प्रक्षेपण व्हेईकलद्वारे काही दिवसांपूर्वी ते अवकाशात स्थापित करण्यात आले. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनीही या महत्त्वाच्या उपक्रमाला पाठिंबा दिल्याबद्दल एलॉन मस्क यांच्या स्पेसएक्सचे आभार मानले आहेत.
सुनीता विल्यम्स यांचा जीव धोक्यात आहे का? सुरक्षित लँडिंगमध्ये आहेत तीन धोके
फायरसॅट काम कसे करणार?
फायरसॅट एआय उपग्रहांचा उद्देश अंतराळातून शक्य तितक्या लवकर संभाव्य वणव्या शोधणे आणि वेळेवर इशारा देणे आहे. गुगलने अर्थ फायर अलायन्स, गॉर्डन अँड बेट्टी मूर फाउंडेशन आणि म्यूऑन स्पेस यांच्या सहकार्याने फायरसॅट उपग्रहांचा हा समूह विकसित केला आहे.
फायरसॅटचा उद्देश जंगलातील आग शोधणे आणि संबंधित एजन्सींना २० मिनिटांच्या अंतराने सूचना पाठविणे आहे. या प्रकल्पाला Google.org द्वारे पाठिंबा आहे. कंपनीला फायरसॅट उपग्रह नक्षत्राच्या प्रक्षेपणासाठी १३ मिलियन डॉलर निधी देण्यात आला आहे.
We have liftoff! After a successful launch this weekend, the first FireSat satellite is now orbiting Earth 🛰️ It’s the first of a 50+ satellite constellation that will help detect + track wildfires as small as 5x5 meters, using AI. Huge thanks to partners @MuonSpace@EarthFireAll… pic.twitter.com/QlaNHXOssD
— Sundar Pichai (@sundarpichai) March 17, 2025
AI तंत्रज्ञानाचा वापर करून आगीची माहिती कशी मिळणार?
या उपग्रहातील नवीन शोध तंत्रज्ञानामध्ये गुगल त्यांच्या प्रगत एआय प्रणालीचा वापर करत आहे. यासाठी, जुन्या घटनांच्या ठिकाण फोटोंचे विश्लेषण केले जाते. यासोबतच, हवामानाची परिस्थिती देखील विचारात घेतली जाते जेणेकरून कोणत्याही क्षेत्रातील आगीचा संभाव्य नमुना शोधता येणार आहे.
ड्रोनऐवजी उपग्रह का?
यापूर्वी गुगल यासाठी उच्च-उंचीवरील ड्रोन वापरण्याचा विचार करत होते. पण नंतर, जेव्हा स्पेसएक्सने या प्रकल्पाला पाठिंबा दिला, तेव्हा उपग्रह पाठवणे त्यांच्यासाठी परवडणारे झाले. यासोबतच, वणव्याचा शोध घेण्यासाठी उपग्रह पाठवण्याचा निर्णय घेतला.