इंग्रजी फाडफाड येत नाही, प्रश्नच मिटला! तुम्ही बोला, गुगल समोरच्याला त्याच्या भाषेत ऐकवणार...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 14:02 IST2025-05-21T13:55:28+5:302025-05-21T14:02:43+5:30
गुगलचा हा इव्हेंट पूर्णपणे एआयवर केंद्रीत आहे. यामध्ये जेमिनी 2.5, गुगल बीम, इमॅजिन 4, व्हेयो 3 सारखी अनेक AI टूल्स सादर करण्यात आली.

इंग्रजी फाडफाड येत नाही, प्रश्नच मिटला! तुम्ही बोला, गुगल समोरच्याला त्याच्या भाषेत ऐकवणार...
गुगलने 'गुगल आय/ओ २०२५' ची धमाकेदार सुरुवात केली आहे. तुम्ही सिनेमात पाहिले असेल पाकिस्तानी लष्करी अधिकारी हिंदीत बोलतो आणि चीनमध्ये बसलेल्या चिनी अधिकाऱ्याला चिनी भाषेत ऐकता येते. सेम तसेच आता प्रत्यक्षात येणार आहे. गुगलच्या वार्षिक डेव्हलपर कॉन्फरन्समध्ये याची घोषणा करण्यात आली आहे.
गुगलचा हा इव्हेंट पूर्णपणे एआयवर केंद्रीत आहे. यामध्ये जेमिनी 2.5, गुगल बीम, इमॅजिन 4, व्हेयो 3 सारखी अनेक AI टूल्स सादर करण्यात आली. जेमिनी आता जीमेल, मीट, मॅप, कॅलेंडर सारख्या अॅप्समध्ये जोडले जात आहे. गुगल बीम खूप खास असणार आहे.
गुगल बीम हा 3D व्हिडिओ कॉलिंग प्लॅटफॉर्म असून त्याद्वारे रिअल-टाइम स्पीच ट्रान्सलेशनही करता येणार आहे. एआयचा वापर यासाठी करण्यात येत आहे. एचपीच्या डिव्हाईसमध्ये याचा वापर सुरुही झाला आहे. याद्वारे नैसर्गिक ऑडिओ तयार होतो. म्हणजेच कृत्रिम बोलणे वाटत नाही. यासाठी सध्या दोनच भाषा वापरण्यात येत असून यात हिंदी देखील असणार आहे. मराठीच्या वापराबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. परंतू, भविष्यात आपली भाषा देखील यात अंतर्भूत होण्याची शक्यता आहे.
व्हेओ ३ हे इमेजेन ४ आणि जेमिनी मॉडेल्सवर आधारित एआय फिल्ममेकिंग टूल आहे. हे नैसर्गिक भाषेच्या प्रॉम्प्टमधून व्हिडिओ आणि ऑडिओ तयार करते.
इमॅजिन ४: नवीन इमेज जनरेशन मॉडेल असून टेक्स्टवरून इमेज तयार करते.
गुगल AI सर्च:
गुगल सर्चमधील एआय मोड अमेरिकेत देण्यात आला असून याद्वारे तुम्ही उत्पादनांची तुलना करणे किंवा तिकिटे बुक करणे यासारख्या जटिल प्रश्नांची उकल करू शकता. याच 'डीप सर्च' फीचर देण्यात आले असून ते शेकडो पेजेस वापरून अहवाल तयार करते.