शहरं
Join us  
Trending Stories
1
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
2
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
3
Shivalik Sharma: मुंबई इंडियन्सच्या खेळाडूला अटक, लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
4
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
5
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
6
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
7
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
8
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
9
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
10
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
11
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
12
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
13
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
14
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
15
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
16
फायद्याची गोष्ट! 'या' ३ गोष्टी फ्रिजमध्ये ठेवण्याची अजिबात करू नका चूक; कॅन्सरचा वाढेल धोका
17
सावधान! WhatsApp वर आला 'प्रोफाईल फोटो' स्‍कॅम; तुमच्या अकाऊंटमधून 'असे' जातील पैसे
18
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा
19
भारताशी पंगा घेणाऱ्या पाकिस्तानला मोठा झटका! 'या' मोठ्या एअरलाईन्स वापरणार नाहीत पाकचा एअरस्पेस
20
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल

Alert! हे 8 अ‍ॅप्स चुकूनही करू नका डाउनलोड; आणखीन 120 धोकादायक अ‍ॅप्स अजूनही अँड्रॉइडवर उपलब्ध 

By सिद्धेश जाधव | Updated: August 23, 2021 11:58 IST

8 Banned Cryptocurrency Apps: Google ने Play Store वरून 8 क्रिप्टोकरन्सी अ‍ॅप्स प्ले स्टोरवरून काढून टाकले आहेत. हे अ‍ॅप्स गेल्या काही महिन्यांपासून युजर्सच्या अकॉउंटवरून क्रिप्टो करन्सीची माहिती चोरत आहेत.  

ठळक मुद्देअजून 120 पेक्षा जास्त नकली क्रिप्टोकरन्सी अ‍ॅप्स अँड्रॉइडवर उपलब्ध असल्याचे Trend Micro ने सांगितले आहेहे अ‍ॅप्स इन्स्टॉल केल्यावर युजर्सची माहिती गोळा करतात.

Google ने Play Store वरून 8 धोकादायक क्रिप्टोकरन्सी अ‍ॅप्स काढून टाकले आहेत. हे अ‍ॅप्स क्रिप्टोकरन्सीसंबंधित अ‍ॅप्स आहेत, ज्यात BitFunds, Bitcoin Miner, Bitcoin इत्यादींचा समावेश आहे. हे अ‍ॅप्स गेल्या काही महिन्यांपासून युजर्सच्या क्रिप्टोकरन्सीची माहिती चोरत असल्यामुळे गुगलने ही कारवाई केली आहे. जर तुमच्या अँड्रॉइड स्मार्टफोनमध्ये हे अ‍ॅप्स असतील तर तुम्ही त्वरित अनइन्स्टॉल करा आणि डेटा देखील डिलीट करा.  

गुगलने क्रिप्टोकरन्सी संबंधित 8 अ‍ॅप्स बॅन केले आहेत. यात 2 अ‍ॅप्स पेड सब्स्क्रिप्शन देतात त्यामुळे काही युजर्स दर महिन्याला $15 म्हणजे जवळपास 1,115 रुपये खर्च करत होते. सिक्योरिटी रिसर्च फर्म Trend Micro ने दिलेल्या माहितीनुसार, हे अ‍ॅप्स इन्स्टॉल केल्यावर युजर्सची माहिती गोळा करतात. माहिती मिळवल्यावर युजर्सना जबरदस्ती जाहिराती दाखवल्या जात होत्या, तसेच व्हायरस देखील पाठवतात. ही माहिती समोर आल्यानंतर Google ने हे अ‍ॅप्स Play Store वरून काढून टाकले आहेत.  हे देखील वाचा: 6000mAh बॅटरी असलेल्या बजेट स्मार्टफोनच्या किंमतीत वाढ; आता इतक्या किंमतीत मिळणार Galaxy M21 2021 Edition

अजून 120 पेक्षा जास्त नकली क्रिप्टोकरन्सी अ‍ॅप्स अँड्रॉइडवर उपलब्ध असल्याचे Trend Micro ने सांगितले आहे. हे अ‍ॅप्स माहिती गोळा करून जबरदस्ती जाहिरात दाखवतात. अश्या अ‍ॅप्सपासून वाचण्यासाठी युजर्सनी रिव्यू वाचावे, असा सल्ला रिसर्च फर्मने दिला आहे. हे देखील वाचा: लई भारी! आता एक क्लिकमध्ये कळणार शरीरातील पाण्याचे प्रमाण; Apple Watch मध्ये मिळू शकतो हायड्रेशन सेन्सर

क्रिप्टोकरन्सी संबंधित बॅन केलेले 8 अ‍ॅप्स:  

Ethereum (ETH) – Pool Mining Cloud 

Bitcoin 2021 

BitFunds – Crypto Cloud Mining 

Bitcoin (BTC) – Pool Mining Cloud Wallet 

Bitcoin Miner – Cloud Mining 

Crypto Holic – Bitcoin Cloud Mining 

Daily Bitcoin Rewards – Cloud Based Mining System 

MineBit Pro – Crypto Cloud Mining & btc miner 

टॅग्स :googleगुगल