TikTok: खूशखबर! भारतात पुन्हा TikTok ची धूम सुरु होणार; या नव्या नावासह लवकरच परतण्याची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2021 08:11 PM2021-07-20T20:11:02+5:302021-07-20T20:12:12+5:30

TikTok will return in India soon: गलवान खोऱ्यातील हिंसक झटापटीनंतर भारताने चिनी कंपन्यांची 59 अ‍ॅप बॅन केली होती. यामध्ये पब्जी, TikTok ही लोकप्रिय अ‍ॅप देखील होती. पब्जी (PUBG Battelground) नव्या रुपात पुन्हा परतला आहे. यामुळे आता TikTok ला देखील भारतात परतण्याचे वेध लागले आहेत.

Good news! TikTok May Make a Comeback in India Soon as TickTock, ByteDance apply for trademark | TikTok: खूशखबर! भारतात पुन्हा TikTok ची धूम सुरु होणार; या नव्या नावासह लवकरच परतण्याची तयारी

TikTok: खूशखबर! भारतात पुन्हा TikTok ची धूम सुरु होणार; या नव्या नावासह लवकरच परतण्याची तयारी

googlenewsNext

गलवान खोऱ्यातील हिंसक झटापटीनंतर भारताने चिनी कंपन्यांची 59 अ‍ॅप बॅन केली होती. यामध्ये पब्जी, TikTok ही लोकप्रिय अ‍ॅप देखील होती. पब्जी (PUBG Battelground) नव्या रुपात पुन्हा परतला आहे. यामुळे आता TikTok ला देखील भारतात परतण्याचे वेध लागले आहेत. यासाठी टिकटॉकची कंपनी बाईटडान्सने (ByteDance) नवीन नाव रजिस्टर करण्यासाठी अर्ज केला आहे. (TikTok May Make a Comeback in India Soon as TickTock)

बाईटडान्सने पेटंट, डिझाईन आणि ट्रेड मार्कसाठी महानियंत्रकांसोबत शॉर्ट-फॉर्म व्हिडिओ अ‍ॅपसाठी ट्रेडमार्क दाखल केला आहे. टिकटॉक बंद झाल्याचा फायदा अन्य प्लॅटफॉर्मनी उचलला होता. टिकटॉकचे एकट्या भारतात 20 कोटी युजर होते. 

बाईटडान्सने 6 जुलैला "TickTock" या नावाने टिकटॉकच्या ट्रेडमार्कसाठी अर्ज केला आहे. ट्विटरवरील टिपस्टर मुकुल शर्मा याने याची माहिती दिली आहे. बाईटडान्सने यावर काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही. (ByteDance has filed the trademark application for TikTok with the name “TickTock.”)

मीडिया रिपोर्ट्सनुसार भारताच्या नव्या आयटी धोरणानुसार टिकटॉक काम करणार आहे. टिकटॉक भारतात परतण्यासाठी बाईटडान्स केंद्र सरकारशी चर्चा करत आहे. चिनी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आयटी नियम पाळणार असल्याचे आश्वासन सरकारला दिले आहे. महत्वाचे म्हणजे, टिकटॉकने 2019 मध्येच नोडल अधिकारी आणि तक्रार अधिकारी नियुक्त केला होता. बंदीच्या वेळी टिकटॉककडे 20 कोटी युजर होते. हे युजर पळविण्याचे काम इन्स्टाग्राम, युट्यूब सारख्या प्लॅटफॉर्मनी केले. यामध्ये काही भारतीय कंपन्यांनी देखील हात धुवून घेतले होते. 

Web Title: Good news! TikTok May Make a Comeback in India Soon as TickTock, ByteDance apply for trademark

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.