Going on vacation ...! Google will alert who sending mail to you ; New feature soon | सुट्टीवर जाताय...! गुगल तुम्हाला मेल पाठविणाऱ्यांना देणार अलर्ट; नवे फिचर लवकरच
सुट्टीवर जाताय...! गुगल तुम्हाला मेल पाठविणाऱ्यांना देणार अलर्ट; नवे फिचर लवकरच

अवघ्या जगाला छोट्याशा स्मार्टफोनवर एकत्र आणणारी कंपनी गुगलने नेहमीच युजरना फायद्याची फिचर आणली आहेत. आता एखादा व्यक्ती सुट्टीवर जात असल्यास त्याला त्याची सुट्टी विना टेन्शन उपभोगू देण्यासाठी गुगल एक चांगले फिचर आणणार आहे. 


गुगल 16 सप्टेंबरला हे फिचर लाँच करणार आहे. या नव्या फिचरमुळे जर कोणी सुट्टीवर जाणार असेल तर त्याला मेल पाठविणाऱ्या व्यक्तींना तो सुट्टीवर असल्याचे अलर्ट पाठविण्यात येणार आहे. हा अलर्ट नोटिफिकेशनद्वारे पाठविला जाणार आहे.


हे फिचर सध्या जी सूट म्हणजेच गुगल एन्टरप्राईज कस्टमर्ससाठी देण्यात येणार आहे. यानंतर 16 सप्टेंबरला ग्लोबली सर्वांसाठी देण्यात येणार आहे. यानंतर काही काळात सामान्य जीमेल वापरणाऱ्यांनाही ही सुविधा मिळण्याची शक्यता आहे. 


कंपनीने सांगितले की, यूजरला यासाठी कॅलेंडरमध्ये  'आउट ऑफ ऑफिस (ओओओ)' एन्ट्री करावी लागेल. यामध्ये सुट्टीवर जाण्याची तारीख आणि येण्याची तारीख नोंद करावी लागेल. यानंतर एखाद्याने मेल केल्यास त्याला सुट्टीवर गेल्याचे नोटिफिकेशन पाठविण्यात येईल. तसेच मेल टाईप करत असताना आऊट ऑफ ऑफिसचा बॅनर दिसेल. जर एखाद्याला हा मॅसेज दाखवायचा नसेल तर तो कॅलेंडरच्या सेटिंगमध्ये जाऊन अॅक्सेस परमिशनमध्ये बदल करू शकतो. 


Web Title: Going on vacation ...! Google will alert who sending mail to you ; New feature soon
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.