Gmail वर आतापर्यंतचा सर्वात मोठा सायबर हल्ला; २५० कोटी युजर्सचा डेटा लीक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 14:29 IST2025-08-28T14:28:18+5:302025-08-28T14:29:13+5:30

गुगल डेटाबेसमधील आतापर्यंतचा हा सर्वात मोठा डेटा लीक आहे.

Gmail suffers biggest cyber attack ever; 2.5 billion users' data leaked | Gmail वर आतापर्यंतचा सर्वात मोठा सायबर हल्ला; २५० कोटी युजर्सचा डेटा लीक

Gmail वर आतापर्यंतचा सर्वात मोठा सायबर हल्ला; २५० कोटी युजर्सचा डेटा लीक

जगभरात कोट्यवधी लोक Gmail चा वापर करतात. दररोज लाखो-करोडो मेल पाठवले जातात, ज्यात महत्वाची माहिती असते. आता याच Gmail वर आतापर्यंतचा सर्वात मोठा सायबर हल्ला झाला आहे. यामुळे २५० कोटी युजर्सची खासगी माहिती लीक झाली आहे. हॅकर्स या माहितीचा गैरवापर करू शकतात. तज्ज्ञांच्या मते, याला गुगल डेटाबेसमधील आतापर्यंतचा सर्वात मोठा डेटा लीक म्हटले जात आहे. 

सर्वात मोठा सायबर हल्ला

Gmail चा डेटाबेस व्यवस्थापित करणारी कंपनी सेल्सफोर्सच्या क्लाउड प्लॅटफॉर्ममध्ये ही डेटा चोरी झाली आहे. या कोट्यवधी युजर्सचा डेटा शायनीहंटर्स नावाच्या हॅकर गटाच्या हातात पोहचला आहे. रिपोर्टनुसार, जून २०२५ मध्ये सेल्सफोर्सच्या क्लाउडमध्ये हा सायबर हल्ला करण्यात आला. हॅकर गटाने सोशल इंजिनिअरिंगचा वापर करुन हा हल्ला केला आहे. गुगलच्या थ्रेट इंटेलिजेंस ग्रुप (GTIG) नुसार, स्कॅमर्सनी आयटी कर्मचाऱ्यांना फोन कॉलद्वारे फसवले. 

स्कॅमर्सनी गुगल कर्मचारी असल्याचे भासवून सेल्सफोर्सशी बनावट अॅप कनेक्ट केले आणि डेटा लीक झाला. या डेटा लीकमुळे, हॅकर्स युजर्सचा संपर्क, व्यवसाय नावे, संबंधित नोट्स इत्यादी मिळवू शकतात. मात्र, गुगलने कोणत्याही युजरचा पासवर्ड लीक झाला नसल्याची पुष्टी केली आहे. मात्र, या हॅकर्सनी अनेक युजर्सच्या डेटाचा गैरवापर करण्यास सुरुवात केली आहे. अनेक ऑनलाइन फोरमवर युजर्सनी फिशिंग ईमेल येत असल्याचा दावे कालआ हे. तसेच, त्यांच्या नंबरवर बनावट कॉल आणि मेसेज पाठवले जात आहेत.

सायबर तज्ञांचे म्हणणे आहे की, या डेटा उल्लंघनाचा युजर्सच्या जीमेल अकाउंटच्या पासवर्डवर थेट परिणाम होणार नाही. मात्र, त्यांची अनेक महत्त्वाची माहिती हॅकर्सच्या हाती आली आहे, ज्याचा वापर करुन ते जीमेल अकाउंट हॅक करू शकतात. हॅकर्स विशेषतः '१२३४५६' आणि 'Password' सारख्या पासवर्ड असलेले अकाउंट हॅक करू शकतात. 

हे कसे टाळायचे?

यासाठी युजर्सनी त्यांचे Gmail खाते डार्क वेबमध्ये ओपन आहे का, ते तपासावे.

यासाठी गुगल अॅपवर जाऊन मॅनेज गुगल अकाउंट वर टॅप करा.

नंतर खाली दिलेला सिक्युरिटी टॅब उघडा आणि डार्क वेब रिपोर्ट वर स्क्रोल करा.

येथे स्टार्ट मॉनिटरिंग वर टॅप करा आणि पुढे जा. 

अशा प्रकारे तुम्ही तुमचे जीमेल अकाउंट डार्क वेबमध्ये आहे की नाही, ते तपासू शकाल.

तुमचे जीमेल अकाउंट डार्क वेबमध्ये असेल, तर तुमच्या अकाउंटचा पासवर्ड बदला आणि टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन चालू करा.

Web Title: Gmail suffers biggest cyber attack ever; 2.5 billion users' data leaked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.