एका कंपनीत घोळ! जगभरातील अनेक वेबसाईट, इंटरनेट तासभर डाऊन; Income Tax क्रॅशमागेही हेच कारण?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2021 05:22 PM2021-06-08T17:22:45+5:302021-06-08T17:23:48+5:30

World wide internet, websites down: मोठमोठ्या बेबसाईट आणि अॅप या कंपनीकडून सेवा घेतात. या कंपनीच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने जगभरातील वेबसाईटही क्रॅश झाल्या होत्या.

global website outage; fastly CDN service has bug, Income Tax website also crashed | एका कंपनीत घोळ! जगभरातील अनेक वेबसाईट, इंटरनेट तासभर डाऊन; Income Tax क्रॅशमागेही हेच कारण?

एका कंपनीत घोळ! जगभरातील अनेक वेबसाईट, इंटरनेट तासभर डाऊन; Income Tax क्रॅशमागेही हेच कारण?

googlenewsNext

जगातील अनेक देशांना आज इंटरनेटने धोका दिला आहे. मंगळवारी इंटरनेट बराच काळ ठप्प झाल्याने अनेक मोठमोठ्या वेबसाईट ओपन होत नव्हत्या (internet, websites down). यामध्ये सोशल मीडिया, सरकारी आणि न्यूज वेबसाईटही होत्या. अमेरिका, ब्रिटनसह अनेक आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी त्यांच्या वेबसाईट डाऊन असल्याचे म्हटले होते. याला कारण अमेरिकेची क्लाऊड कॉम्प्युटिंग सेवा देणारी कंपनी फास्टली असल्याचे समोर आले आहे. (multiple outages hit social media, government and news websites across the globe Tuesday morning after an apparent widespread outage at the cloud service company Fastly.)


मोठमोठ्या बेबसाईट आणि अॅप या कंपनीकडून सेवा घेतात. या कंपनीच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने जगभरातील वेबसाईटही क्रॅश झाल्या होत्या. फास्टलीने सांगितले की, सीडीएन सर्व्हिसेसमध्ये बिघाड झाल्याने सर्व सेवा ठप्प झाली होती. आता हा बिघाड दुरुस्त करण्यात आला असून याचा शोध घेतला जात असल्याचे कंपनीने म्हटले आहे. 

Income Tax: आयकर विभागाची नवी वेबसाईट 'क्रॅश'; सीतारामननी इन्फोसिस, निलेकनींचा ट्विटरवर क्लास घेतला


रेडिट, अमेझॉन इंकची रिटेल वेबसाईटही डाऊन होती. या बिघाडावर कंपनीने अधिक माहिती दिलेली नाही. रेडिटच्या जवळपास 21 हजार हून अधिक युजरनी सोशल मीडियावर वेबसाईट बंद असल्याचे किंवा बिघाड असल्याच्या पोस्ट केल्या आहेत. तर 2000 हून अधिक युजरनी अॅमेझॉनच्या साईटवर समस्या असल्याचे म्हटले होते. डाउटेजवर लक्ष ठेवणाऱी वेबसाईट डाउनडिटेक्‍टर डॉट कॉमने ही माहिती दिली आहे. 


फाइनान्शियल टाइम्‍स, द गार्डियन, द न्‍यूयॉर्क टाइम्‍स, ब्लूमबर्ग सारख्य़ा वेबसाईटना याचा फटका बसला. महत्वाचे म्हणजे भारतातील आयकर विभागाची वेबसाईटही काही काळ क्रॅश झाली होती. यावेळी अर्थमंत्र्यांनी इन्फोसिसला धारेवर धरले होते. या समस्येमागे फास्टलीमधील समस्या असल्याचे अद्याप स्पष्ट झालेले नाही. 

Web Title: global website outage; fastly CDN service has bug, Income Tax website also crashed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.