शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

दिग्गज IT कंपनी 30000 कर्मचाऱ्यांना देणार नारळ; AI प्रकल्पाशी संबंधित सर्वात मोठी छाटणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2026 18:36 IST

बँकांनीही ऐनवेळी AI प्रकल्पातून हात काढून घेतले.

Layoff News: आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी ओरेकल (Oracle) सुमारे 20 ते 30 हजार कर्मचाऱ्यांची कपात करण्याच्या तयारीत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अहवालानुसार, ही कपात कंपनीच्या AI डेटा सेंटर प्रकल्पांशी संबंधित पुनर्रचनेचा भाग असू शकते.

CIO (Chief Information Officer) च्या अहवालानुसार, ओरेकल आपल्या काही मालमत्ता विकण्याचा विचार करत असून, यामागे अमेरिकन बँकांनी कंपनीच्या AI डेटा सेंटर प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करण्यास अनिच्छा दर्शवणे, हे प्रमुख कारण असल्याचे सांगितले जात आहे.

AI रिस्ट्रक्चरिंगच्या पार्श्वभूमीवर कपात

काही दिवसांपूर्वीच अ‍ॅमेझॉनकडून 16 हजार कर्मचाऱ्यांच्या कपातीची घोषणा करण्यात आली होती. त्या कपातीमागेही AI आधारित रिस्ट्रक्चरिंग प्लॅन असल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे टेक सेक्टरमध्ये AI मुळे नोकऱ्यांवर वाढता ताण स्पष्टपणे दिसून येतोय.

ओरेकलच्या आर्थिक क्षमतेवर गुंतवणूकदारांचा प्रश्नचिन्ह

CIO च्या अहवालात असे नमूद करण्यात आले आहे की, ओरेकलच्या इक्विटी आणि कर्ज देणाऱ्या गुंतवणूकदारांनी कंपनीच्या AI डेटा सेंटर उभारण्याच्या क्षमतेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. कंपनीची सध्याची आर्थिक स्थिती आणि ग्राहकांशी असलेले संबंध याचा परिणाम या निर्णयांवर होत असल्याचेही अहवालात नमूद आहे.

ओरेकलने यापूर्वी OpenAI (सॅम ऑल्टमॅन यांच्या नेतृत्वाखालील) संस्थेसाठी डेटा सेंटर उभारण्याचा मोठा प्रकल्प हाती घेतला होता. या प्रकल्पासाठी सुमारे 156 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची कमिटमेंट होती. मात्र आता बँका या प्रकल्पासाठी कर्ज देण्यापासून मागे हटत असल्याचे सांगितले जात आहे.

छाटणीचा संभाव्य आर्थिक फायदा

अहवालानुसार, या मोठ्या प्रमाणावरील छाटणीमुळे ओरेकलला सुमारे 8 ते 10 अब्ज डॉलर्सचा कॅश फ्लो उपलब्ध होऊ शकतो. मात्र, या संपूर्ण प्रकरणावर ओरेकलकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

इतिहासातील सर्वात मोठी कपात

जर 20–30 हजार कर्मचाऱ्यांची छाटणी प्रत्यक्षात झाली, तर ती ओरेकलच्या इतिहासातील सर्वात मोठी छाटणी ठरेल. याआधी 2025 मध्ये कंपनीने 10 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले होते, तेव्हा 1.6 अब्ज डॉलर्सच्या रिस्ट्रक्चरिंग प्लॅनचा हवाला देण्यात आला होता.

English
हिंदी सारांश
Web Title : Oracle to Lay Off 30,000 Employees Amid AI Restructuring

Web Summary : Oracle is reportedly planning to lay off 20,000-30,000 employees due to AI data center restructuring. Investment concerns over Oracle's AI capabilities and potential financial benefits are driving the decision, marking a potentially historic workforce reduction.
टॅग्स :jobनोकरीEmployeeकर्मचारीAmericaअमेरिकाamazonअ‍ॅमेझॉन