चीनचा रोबोट भारतीय विद्यापीठाने Ai समिटमध्ये दाखविला; चीनसह स्वदेशी नेटकऱ्यांनी शाळा घेताच...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 10:00 IST2026-02-18T09:58:22+5:302026-02-18T10:00:07+5:30

Galgotias University Robodog Controversy: दिल्लीतील AI समिटमध्ये गलगोटिया विद्यापीठाने मांडलेला 'ओरियन' रोबोडॉग चिनी बनावटीचा असल्याचा आरोप. विद्यापीठाने दिलेले स्पष्टीकरण आणि व्हायरल वादाबद्दल सविस्तर वाचा.

Galgotias University Robodog Controversy: Chinese robot displayed by Indian university at AI Summit; Chinese and domestic netizens are exposed fake claims | चीनचा रोबोट भारतीय विद्यापीठाने Ai समिटमध्ये दाखविला; चीनसह स्वदेशी नेटकऱ्यांनी शाळा घेताच...

चीनचा रोबोट भारतीय विद्यापीठाने Ai समिटमध्ये दाखविला; चीनसह स्वदेशी नेटकऱ्यांनी शाळा घेताच...

नवी दिल्ली: दिल्लीत आयोजित 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये एका रोबोटिक कुत्र्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. गलगोटिया युनिव्हर्सिटीने प्रदर्शनात मांडलेला 'ओरियन' नावाचा रोबोडॉग हा प्रत्यक्षात चीनमधील 'युनिट्री' कंपनीचे उत्पादन असल्याचे समोर आल्यानंतर सोशल मीडियावर टीकेची झोड उठली आहे.

समिटमधील एका व्हायरल व्हिडिओमध्ये विद्यापीठाच्या प्रतिनिधीने हा रोबोडॉग त्यांच्या 'सेंटर ऑफ एक्सलन्स'ने विकसित केल्याचा दावा केला होता. प्रसारमाध्यमांकडून चांगली प्रसिद्धीही मिळविली होती, असा आरोप  युजर्सनी केला आहे. चमकोगिरी सुरु असताना हा रोबोडॉग प्रत्यक्षात चीनच्या 'Unitree Go2' या मॉडेलसारखा दिसत असून त्याची किंमत साधारण २ ते ३ लाख रुपये आहे, असे समोर आले आणि या विद्यापीठाची बनवेगिरी जगजाहीर झाली. "परदेशी तंत्रज्ञान स्वतःचे नाव देऊन मिरवणे चुकीचे आहे," अशा आशयाच्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या. त्यात चायना पल्स या सोशल मीडिया हँडलने चीनच्या कंपनीचा रोबोट भारतीय विद्यापीठ स्वत:चा असल्याचे सांगत असल्याचे म्हटले आणि हा आंतरराष्ट्रीय मुद्दा केला. यावरून सोशल मीडियावर दिवसभर चांगलीच नाचक्की झाली. 

दिवसभराच्या नाचक्कीनंतर रात्री विद्यापीठाचा खुलासा
वाद वाढल्यानंतर गलगोटिया विद्यापीठाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर आपली भूमिका स्पष्ट केली. विद्यापीठाने रात्री उशिरा म्हटले की, "आम्ही हा रोबोडॉग बनवल्याचा दावा कधीही केलेला नाही. हा रोबोट चीनच्या 'युनिट्री' कंपनीकडून खरेदी करण्यात आला असून तो आमच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आणि प्रयोगांसाठी एक साधन म्हणून वापरला जातोय. विद्यार्थ्यांना जागतिक तंत्रज्ञानाचा अनुभव मिळावा हाच आमचा उद्देश आहे."

फॅक्ट-चेकमध्ये वेगळीच माहिती
विद्यापीठाने स्पष्टीकरण दिले असले तरी, 'X' च्या कम्युनिटी नोट्समध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, प्रदर्शनादरम्यान या रोबोटला 'ओरियन' नाव देण्यात आले होते आणि तो स्वतः विकसित केल्याचे भासवले गेले होते. या विसंगतीमुळे इंटरनेटवर या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे.

Web Title : भारतीय विश्वविद्यालय द्वारा चीनी रोबोट का प्रदर्शन, एआई शिखर सम्मेलन में विवाद

Web Summary : भारतीय विश्वविद्यालय ने एआई शिखर सम्मेलन में चीनी रोबोट कुत्ते का प्रदर्शन किया, और दावा किया कि यह उनका अपना है। सोशल मीडिया पर प्रतिक्रिया हुई, जिससे झूठ उजागर हो गया। विश्वविद्यालय ने बाद में स्पष्ट किया कि इसे शैक्षिक उद्देश्यों के लिए खरीदा गया था, लेकिन विसंगतियां बनी हुई हैं।

Web Title : Chinese Robot Displayed by Indian University Sparks Controversy at AI Summit

Web Summary : An Indian university showcased a Chinese robot dog at an AI summit, claiming it was their own. Social media backlash ensued, exposing the fabrication. The university later clarified it was purchased for educational purposes, but inconsistencies remain.