Galaxy S26 Ultra vs Galaxy S25 Ultra: दोन्ही फोनमध्ये काय फरक? अपग्रेड करावा का? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 12:12 IST2026-02-26T12:11:37+5:302026-02-26T12:12:44+5:30

Galaxy S26 Ultra vs Galaxy S25 Ultra: सॅमसंगने काल आपली बहुप्रतिक्षित Galaxy S26 सीरीज लॉन्च केली आहे.

Galaxy S26 Ultra vs Galaxy S25 Ultra: What's the difference between the two phones? Should you upgrade? Find out | Galaxy S26 Ultra vs Galaxy S25 Ultra: दोन्ही फोनमध्ये काय फरक? अपग्रेड करावा का? जाणून घ्या...

Galaxy S26 Ultra vs Galaxy S25 Ultra: दोन्ही फोनमध्ये काय फरक? अपग्रेड करावा का? जाणून घ्या...

Galaxy S26 Ultra vs Galaxy S25 Ultra:सॅमसंगने काल(दि.25) रात्री आपली बहुप्रतिक्षित Galaxy S26 सीरीज अधिकृतपणे लॉन्च केली असून, यामधील फ्लॅगशिप स्मार्टफोन Galaxy S26 Ultra सध्या चर्चेत आला आहे. प्रायव्हसी डिस्प्लेपासून ते दमदार परफॉर्मन्स आणि फास्ट चार्जिंगपर्यंत, S26 Ultra मध्ये अनेक महत्त्वाचे अपग्रेड्स देण्यात आले आहेत. मात्र, गेल्या वर्षी आलेला Galaxy S25 Ultra वापरणाऱ्यांनी नवीन फोनमध्ये अपग्रेड करावे का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

डिस्प्ले आणि डिझाइन

Galaxy S26 Ultra आणि Galaxy S25 Ultra या दोन्ही स्मार्टफोन्समध्ये 6.9 इंच QHD+ Dynamic AMOLED 2X डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 1Hz ते 120Hz अ‍ॅडॅप्टिव्ह रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो.

मात्र, S26 Ultra मधील सर्वात मोठा बदल म्हणजे प्रायव्हसी डिस्प्ले. ही सुविधा S25 Ultra मध्ये उपलब्ध नाही. डिझाइनच्या बाबतीतही नवीन मॉडेल थोडे अधिक रिफाइन्ड करण्यात आले आहे. S26 Ultra हा S25 Ultra पेक्षा 0.3 मिमीने पातळ आणि 4 ग्रॅमने हलका असून, फोनचे कोपरे (कॉर्नर्स) अधिक राउंड करण्यात आले आहेत.

परफॉर्मन्स

Galaxy S25 Ultra मध्ये सॅमसंगने Qualcomm Snapdragon 8 Elite प्रोसेसर दिला होता. तर S26 Ultra मध्ये कंपनीने आणखी एक पाऊल पुढे टाकत Snapdragon 8 Elite Gen 5 चिपसेट वापरला आहे.

नवीन प्रोसेसरमुळे CPU परफॉर्मन्समध्ये 19 टक्के सुधारणा, GPU परफॉर्मन्समध्ये 24 टक्के वाढ. तसेच, फोन जास्त गरम होऊ नये यासाठी S26 Ultra मध्ये पूर्णपणे नवीन वॅपर चेंबर कूलिंग सिस्टीम देण्यात आली आहे, जी दीर्घकाळ वापरात स्थिर परफॉर्मन्स देण्यास मदत करते.

कॅमेरा

दोन्ही फोनचा कॅमेरा सेटअप जवळपास सारखाच आहे. 

रियर कॅमेरा सेटअप:

200MP प्रायमरी कॅमेरा

50MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा

50MP + 10MP टेलिफोटो कॅमेरे

मात्र, Galaxy S26 Ultra मध्ये कॅमेऱ्याचा अपर्चर अधिक वाइड करण्यात आला आहे. यामुळे कमी प्रकाशात (Low Light) अधिक चांगले फोटो मिळतील.
याशिवाय, नाइटोग्राफी व्हिडीओ रेकॉर्डिंगमध्येही सुधारणा करण्यात आली आहे.

बॅटरी आणि चार्जिंग

दोन्ही स्मार्टफोन्समध्ये 5,000mAh बॅटरी देण्यात आली आहे. मात्र, चार्जिंगच्या बाबतीत Galaxy S26 Ultra सरस ठरतो.

S25 Ultra: 45W फास्ट चार्जिंग

S26 Ultra: 60W फास्ट चार्जिंग सपोर्ट

कंपनीनुसार, S26 Ultra फक्त 30 मिनिटांत 75 टक्के चार्ज होतो. तसेच, वायरलेस चार्जिंग तंत्रज्ञानातही सुधारणा करण्यात आली आहे.

किंमत किती?

Galaxy S26 Ultra (भारत): ₹1,39,999 पासून

Galaxy S25 Ultra (लॉन्च किंमत): ₹1,29,999

सध्या Galaxy S25 Ultra हा Amazon आणि इतर ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर ₹20,000 ते ₹25,000 सवलतीसह उपलब्ध आहे.

अपग्रेड करावा की नाही?

जर तुम्हाला प्रायव्हसी डिस्प्ले, अधिक वेगवान परफॉर्मन्स, सुधारित कूलिंग आणि फास्ट चार्जिंग हवी असेल, तर Galaxy S26 Ultra हा नक्कीच एक मजबूत पर्याय आहे. मात्र, Galaxy S25 Ultra वापरणाऱ्यांसाठी कॅमेरा आणि डिस्प्लेतील बदल तुलनेने मर्यादित असल्याने, मोठ्या सवलतीत S25 Ultra घेणेही अनेकांसाठी अधिक किफायतशीर ठरू शकते. तंत्रज्ञानप्रेमींकरता S26 Ultra हे नवे फ्लॅगशिप स्टँडर्ड सेट करत असले, तरी अपग्रेडचा निर्णय तुमच्या वापराच्या गरजांवर अवलंबून आहे.
 

Web Title : Galaxy S26 Ultra बनाम S25 Ultra: क्या आपको अपग्रेड करना चाहिए?

Web Summary : सैमसंग के Galaxy S26 Ultra में S25 Ultra की तुलना में प्राइवेसी डिस्प्ले, तेज परफॉर्मेंस और बेहतर कूलिंग है। कैमरे में मामूली सुधार हैं, लेकिन तेज चार्जिंग और परिष्कृत डिजाइन इसे आकर्षक बनाते हैं। S25 Ultra उपयोगकर्ताओं को पुराने मॉडल पर मिलने वाली छूट के मुकाबले फायदों का आकलन करना चाहिए।

Web Title : Galaxy S26 Ultra vs S25 Ultra: Should You Upgrade?

Web Summary : Samsung's Galaxy S26 Ultra boasts a privacy display, faster performance, and improved cooling over the S25 Ultra. While camera upgrades are incremental, faster charging and a refined design make it appealing. Existing S25 Ultra users should weigh the benefits against potential discounts on the older model.