एकच ट्रिक करा, लाईट बिल निम्म्यावर आणा! तुमचा निष्काळजीपणाच खिशाला भारी पडतोय

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2022 04:26 PM2022-08-27T16:26:20+5:302022-08-27T16:27:36+5:30

जास्त वीजबिल ही एक सामान्य समस्या बनली आहे. अशा परिस्थितीत घरातील कोणतीही वस्तू वापरण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घेणे खूप गरजेचे आहे.

gadgets news electricity bill will get half change these 2 devices use this trick tata power | एकच ट्रिक करा, लाईट बिल निम्म्यावर आणा! तुमचा निष्काळजीपणाच खिशाला भारी पडतोय

एकच ट्रिक करा, लाईट बिल निम्म्यावर आणा! तुमचा निष्काळजीपणाच खिशाला भारी पडतोय

Next

उन्हाळ्यात जास्त वीजबिल ही एक सामान्य समस्या बनली आहे. अशा परिस्थितीत घरातील कोणतीही वस्तू वापरण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. तसेच, काळानुरूप त्या बदलणेही खूप महत्त्वाचे ठरते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही गोष्टींबद्दल माहिती देणार आहोत. केवळ आम्हीच नाही, तर वीज कंपन्याही तुम्हाला हाच सल्ला देत असतात.

आपल्या घरात अनेक स्वीच असतात. काही वेळा घाईघाईत किंवा अनावधाने आपण स्वीच बंद करणं विसरून जातो. परंतु त्या स्वीचमध्ये काहीही लावलेलं असो किंवा नसो तो स्वीच बंद ठेवणं आवश्यक आहे. जर स्वीच ऑन ठेवलं तर त्यातही वीज खर्च होते. उदाहरण म्हणून पाहायचं झालं तर तुम्ही टीव्ही, मायक्रोवेव्ह, वॉशिंग मशीन यांचा वापर करता. अनेकदा पाहून झाल्यानंतर टीव्ही आपण रिमोटनं बंद करतो, पण स्वीच बंद करत नाही. यासाठी कायम स्वीच बंद करणं तुमच्या फायद्याचं ठरू शकतं.

एसीमुळे बिल जास्त येतं

एसीमुळे वीज बिलही खूप येतं. तुम्ही तुमच्या घराचं वीज बिल सहज कमी करू शकता. टाटा पॉवरच्या मते, उन्हाळ्यात एसी चालवताना तुम्ही अत्यंत काळजी घेतली पाहिजे. अनेक वेळा एसीचं तापमान सतत वाढवत राहिल्याने किंवा कमी केल्याने विजेचा वापरही जास्त होतो. अशा स्थितीत एसी त्याच तापमानावर ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.

टाटा पॉवरचं म्हणणं आहे की वीज बिलात बचत करण्यासाठी तुम्ही एसी 26 अंशांवर सेट ठेवा. यासोबतच तुमचे शरीरही खूप आरामदायक राहतं आणि एसीचं कुलिंगही जास्त होऊ लागते. त्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे यामुळे वीजेची खूप बचत होते.

Web Title: gadgets news electricity bill will get half change these 2 devices use this trick tata power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.