Grok 3 AI : कोडिंग ते लाईव्ह गेम, एलन मस्क यांचा मोठा दावा; जगातील सर्वात स्मार्ट Grok 3 AI लाँच
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 11:44 IST2025-02-18T11:43:53+5:302025-02-18T11:44:32+5:30
Elon Musk Grok 3 AI : काही वर्षांपूर्वी चॅट जिपीटी लाँच झाल्यापासून कंपन्यांनी एआय निर्माण करण्यास सुरुवात केली आहे.

Grok 3 AI : कोडिंग ते लाईव्ह गेम, एलन मस्क यांचा मोठा दावा; जगातील सर्वात स्मार्ट Grok 3 AI लाँच
एलन मस्क यांनी एआयच्या स्पर्धेत उडी मारली आहे. मस्क यांच्या xAI ने जगातील सर्वात स्मार्ट एआय लाँच केला आहे. असा दावा मस्क यांच्या कंपनीने केला आहे. यामध्ये कोडिंगपासून ते लाईव्ह गेम्स बनविण्यापर्यंत सर्व काही केले जाऊ शकते. हे एआय मॉडेल प्रिमिअम युजर्ससाठी जारी करण्यात आले आहे.
लवकरच Grok 3 चे एपीआय व्हर्जन लाँच करण्यात आले आहे. याचा वापर कंपन्या करू शकणार आहेत. मस्क यांनी सांगितले की, हे एआय मॉडेल दोन लाख जीपीयूच्या मदतीने ट्रेन करण्यात आले आहे. हा जगातील सर्वात स्मार्ट एआय असेल.
काही वर्षांपूर्वी चॅट जिपीटी लाँच झाल्यापासून कंपन्यांनी एआय निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. यानंतर गुगलने आपला जेमिनी आणला आहे. चीनने डीपसीक आणला आणि खरी स्पर्धा सुरु झाली. अमेरिकेलाही तगड्या एआयची गरज भासू लागली होती. ती मस्क पूर्ण करण्याची शक्यता आहे. परंतू, मस्क यांच्या कंपनीच्या दाव्यानुसार हा एआय टेक डेव्हलपमेंटमध्येच आहे की अन्य बाबींमध्येही कार्यक्षम आहे यावर या एआयची उपयुक्तता ठरणार आहे.
मस्कनी काही दिवसांपूर्वीच ओपन एआयला विकत घेण्याची $97.4 अब्जांची ऑफर दिली होती. सॅम ऑल्टमन ओपनएआय बोर्डाने ही ऑफर नाकारली होती. याच्या आठवडाभरातच मस्क यांनी त्यांचा एआय लाँच केला आहे. मग मुळात मस्क यांना ओपन एआय का हवा झाला, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. म्हणजेच मस्क यांचा एआय तेवढ्या क्षमतेचा नाही, किंवा त्यात ओपन एआयची जी माहिती देतो ती उपलब्ध नाही, असा कयास लावला जात आहे.