राज्यात थंडी वाढण्याचा अंदाज
By admin | Updated: February 4, 2015 01:06 IST
तापमानात वाढ : चंद्रपूरमध्ये सर्वात कमी ११.६ अंश सेल्सिअसची नोंद
राज्यात थंडी वाढण्याचा अंदाज
तापमानात वाढ : चंद्रपूरमध्ये सर्वात कमी ११.६ अंश सेल्सिअसची नोंदपुणे : पुढील ४८ तासात राज्याच्या तापमानात घट होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. दरम्यान, आज राज्याच्या तापमानात वाढ मात्र वाढ नोंदविली गेली. केवळ विदर्भ आणि मराठवाडयातच थंडी होती. चंद्रपूरमध्ये सर्वात कमी ११.६ अंश सेल्सिअसची नोंद करण्यात आली.बंगालच्या उपसागरात हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रीय असल्यामुळे तेथून बाष्पयुक्त वारे राज्यात वाहत असल्याने तापमानात वाढ होत आहे. मात्र या पट्टयाची तीव्रता कमी होणार असल्याने राज्यात पुन्हा थंडी पडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.मात्र गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत आज राज्याच्या तापमानात वाढ झाली. एकाही शहराचे तापमान दहा अंशाच्या आत नव्हते. केवळ विदर्भ आणि मराठवाडयातील शहरांचे किमान तापमान सरासरीच्या खाली होते. राज्यातील उर्वरित भागांचे तापमान सरासरीच्या वर होते.दरम्यान, आज पुण्याच्या तापमानात वाढ झाली. किमान तापमान १३.६ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. तर किमान तापमान १३.६ अंश सेल्सिअस होते. शहरात आज दिवसभर ढगाळ हवामान होते. त्यामुळे सुर्याचे दर्शन होत नव्हते. पुढील ४८ तास शहरात ढगाळ हवामान राहणार असून तापमान चढेच राहिल, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.प्रमुख शहरांमधील किमान तापमान पुढीलप्रमाणे (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे १३.६, अहमदनगर १२, जळगाव १५.४, कोल्हापूर १७.६, महाबळेश्वर १५.३, मालेगाव १५.३, नाशिक १२, सांगली १७, सातारा १३.५, सोलापूर १८.३, मुंबई २०.१, अलिबाग १८, रत्नागिरी १९.१, डहाणू १६.७, भिरा १४.५, उस्मानाबाद १५.४, औरंगाबाद १६.३, परभणी १७.६, नांदेड १२, बीड १९.२, अकोला १७.९, अमरावती १३.२, बुलडाणा १८.५, ब्रम्हपूरी १४.५, चंद्रपूर ११.६, नागपूर १२.१, वाशिम १९.२, वर्धा १५.५, यवतमाळ १७.८.