पुन्हा मिळणार नाही अशी ऑफर! iPhone 12 वर मिळतेय 27 हजारांची बंपर सूट; तुटून पडले ग्राहक
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2022 15:49 IST2022-06-14T15:49:01+5:302022-06-14T15:49:06+5:30
Flipkart End Of Season Sale मध्ये iPhone 12 आतापर्यंतच्या सर्वाधिक डिस्काउंटसह विकला जात आहे.

पुन्हा मिळणार नाही अशी ऑफर! iPhone 12 वर मिळतेय 27 हजारांची बंपर सूट; तुटून पडले ग्राहक
Flipkart End Of Season Sale सुरु आहे त्यामुळे फक्त स्मार्टफोन्सच नव्हे तर अन्य इलेक्ट्रॉनिक्स देखील स्वस्तात मिळत आहे. हा सेल 11 जूनला सुरु झाला असून 17 जूनला याची समाप्ती होईल. सेलमध्ये लोकप्रिय iPhones देखील अँड्रॉइडपेक्षा स्वस्तात मिळत आहेत. आज iPhone 12 वर बंपर सूट दिली जात आहे. त्यामुळे हा प्रीमियम फोन आतापर्यंतच्या सर्वात कमी किंमतीत विकला जात आहे.
iPhone 12 वर मिळतो डिस्काउंट
iPhone 12 चा 128 GB व्हेरिएंट भारतात 70,900 रुपयांमध्ये लाँच झाला आहे. परंतु या सेलमधून याची विक्री 58,999 रुपयांमध्ये केली जात आहे. फ्लिपकार्टकडून 11,901 रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे. iPhone 12 ची खरेदी करताना Axis बँकेच्या क्रेडिट कार्डचा वापर केल्यास 3 हजार रुपयांची सूट मिळेल. त्यामुळे फोनची किंमत 55,999 रुपये होईल. iPhone 12 वर 12,500 रुपयांची सूट तुम्ही जुना स्मार्टफोन एक्सचेंज करून मिळवू शकता. म्हणजे हा आयफोन 43,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल.
iPhone 12 चे स्पेसिफिकेशन्स
iPhone 12 हा मोबाईल 6.1-इंचाच्या सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्लेसह सादर करण्यात आला आहे. ज्यात A14 बायोनिक चिप देण्यात आली आहे. मागे ड्युअल कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात दोन्ही सेन्सर्स 12MP चे आहे. फ्रंटला देखील 12MP चा सेल्फी कॅमेरा आहे. हा एक 5G स्मार्टफोन आहे जो ड्युअल सिमला सपोर्ट करतो