Flipkart Sale: 39 हजारांचा डिस्काउंट! Windows 11 असलेल्या Lenovo चा लॅपटॉप स्वस्तात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2022 19:07 IST2022-02-26T19:06:51+5:302022-02-26T19:07:02+5:30

Flipkart Electronics Sale मध्ये स्मार्टफोन, स्मार्टवॉच, स्पिकर्ससह लॅपटॉप देखील स्वस्तात मिळत आहे. यात Lenovo चा एक लॅपटॉप 39 हजार रुपयांपेक्षा जास्त डिस्काउंटसह उपलब्ध झाला आहे.  

Flipkart electronics sale buy lenovo laptop with upto rs 39100 discount   | Flipkart Sale: 39 हजारांचा डिस्काउंट! Windows 11 असलेल्या Lenovo चा लॅपटॉप स्वस्तात 

Flipkart Sale: 39 हजारांचा डिस्काउंट! Windows 11 असलेल्या Lenovo चा लॅपटॉप स्वस्तात 

Lenovo चा एक लॅपटॉप फ्लिपकार्टच्या Electronics Sale मध्ये मोठ्या डिस्काउंटसह उपलब्ध झाला आहे. हा सेल 28 फेब्रुवारीला संपणार आहे. या सेलमध्ये फ्लिपकार्टकडून थेट डिस्काउंट तर दिला जात आहे. सोबत बँक ऑफर्स देखील आहेत. तसेच योग्य लॅपटॉप एक्सचेंज केल्यास 18,100 रुपयांची बचत करता येईल आणि एकूण डिस्काउंट 39 हजारांच्या वर जाईल.  

Lenovo IdeaPad 3 वरील ऑफर्स 

Lenovo IdeaPad 3 Thin and Light या लॅपटॉपची किंमत 57,990 रुपये आहे. फ्लिपकार्टवर 32 टक्के डिस्काउंट नंतर याची किंमत 38,990 रुपय झाली आहे. आयडीफसी बँकेच्या क्रेडिट कार्डवर 1,500 रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. त्यामुळे या लॅपटॉपची किंमत 36,990 रुपये होईल. या लॅपटॉपवर एक्सचेंज ऑफर देखील दिली जात आहे. त्यामुळे तुम्ही जुना लॅपटॉप देऊन 18,100 रुपयांची बचत करू शकता. आणि त्यामुळे या लेनोवो लॅपटॉपची प्रभावी किंमत 18,890 रुपये होईल.  

Lenovo IdeaPad 3 Laptop चे स्पेसिफिकेशन्स  

या लॅपटॉपमध्ये 15.6 इंचाचा फुल एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा एक अँटी ग्लेयर डिस्प्ले आहे. यात Intel Core i3, 10th जेन प्रोसेसर देण्यात आला आहे. सोबत 8GB RAM आणि 256GB SSD स्टोरेज मिळते. हा लॅपटॉप विंडोज 11 होम एडिशनवर चालतो. यातील 720p वेबकॅमेरासह प्रायव्हसी शटर देण्यात आलं आहे. कनेक्टिव्हिटीसाठी यात एक कार्ड रीडर, यूएसबी पोर्ट्स आणि एक एचडीएमआय पोर्ट मिळतो.   

हे देखील वाचा:

Web Title: Flipkart electronics sale buy lenovo laptop with upto rs 39100 discount