आयफोन १६ खरेदी करण्याची योग्य वेळ; २७ हजारांहून अधिक रुपये वाचतील, कुठे सुरू आहे ऑफर?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 14:14 IST2025-09-19T14:12:05+5:302025-09-19T14:14:04+5:30
iPhone 16: आयफोन १६ खरेदी करण्याचा विचार करत असलेल्या ग्राहकांसाठी सुवर्णसंधी आहे.

आयफोन १६ खरेदी करण्याची योग्य वेळ; २७ हजारांहून अधिक रुपये वाचतील, कुठे सुरू आहे ऑफर?
आयफोन खरेदी करण्याचे अनेकांचे स्वप्न असते. परंतु, आयफोनच्या किंमती आवक्याबाहेर असल्याने अनेकजण त्याकडे पाठ फिरवतात. अशा ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेलमध्ये आयफोन १६ मोठ्या सवलतीसह उपलब्ध झाला आहे.
आयफोन १६ हा गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात ७९ हजार ९०० रुपयांत लॉन्च झाला. फ्लिपकार्ट सेल दरम्यान आयफोन १६ (१२८ जीबी) ची किंमत सुमारे ५१ हजार ९९९ पर्यंत घसरली आहे, ज्यात बँक ऑफर्सचा समावेश आहे. म्हणजेच ग्राहकांना सेल दरम्यान २७,००१ रुपयांची सूट मिळत आहे. आयफोन १६ प्रो आणि प्रो मॅक्स व्हेरिएंट आकर्षक सूट मिळत आहे. आयफोन १६ प्रोची किंमत १ लाख १९ हजार ९०० रुपये इतकी आहे. तर, आयफोन १६ प्रो मॅक्स १ लाख ४४ हजार ९०० रुपयांत लॉन्च झाला. फ्लिपकार्ट सेलमध्ये हे दोन्ही फोन अनुक्रमे ६९ हजार ९९९ रुपये आणि ८९ हजार ९९९ रुपयांत उपलब्ध आहेत.
आयफोन १६ मध्ये ग्राहकांना ६.१ इंचाचा सुपर रेटीना एक्सडीआर डिस्प्ले देण्यात आले आहे. हा फोन iOS १८ वर चालतो. यात ४८ मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा आणि १२ मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा मिळतो, यामुळे चांगल्या दर्जाचे फोटो आणि व्हिडिओ काढता येतात. आयफोन १६ हा १२८ जीबी स्टोरज, २५६ जीबी स्टोरेज आणि ५१२ जीबी स्टोरेज पर्यायांसह उपलब्ध आहे. आयफोन १६ मध्ये 'ॲक्शन बटन' आणि 'कॅमेरा कंट्रोल बटन' देण्यात आले, जे जुन्या मॉडेलमध्ये मिळत नाही. तसेच यात Wi-Fi 7 आणि Bluetooth 5.3 सारखी नवीनतम कनेक्टिव्हिटी फीचर्स आहेत. शिवाय, या फोनची बॅटरी लाइफही चांगली आहे.