Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2025 14:40 IST2025-09-11T14:39:26+5:302025-09-11T14:40:50+5:30
flipkart big billion days: नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे.

Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!
नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. येत्या २३ डिसेंबर २०२५ पासून सुरू होणार्या फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेज सेलमध्ये ग्राहकांना गुगल पिक्सेल ९ च्या खरेदीवर जबरदस्त सूट मिळत आहे. या सेलमध्ये गुगल पिक्सेल ९ त्याच्या अर्ध्यापेक्षा कमी किंमतीत उपलब्ध असेल, असे कंपनीकडून जाहीर करण्यात आले.
कंपनीने जाहीर केले आहे की ७९ हजार ९९९ रुपयांच्या किमतीत लाँच झालेला हा फोन ३४ हजार ९९९ रुपयांना उपलब्ध असेल. हा फोन ३७ हजार ९९९ रुपयांना सूचीबद्ध केला जाईल आणि ग्राहकांना आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्डने त्यावर २००० रुपये आणि एक्सचेंज डिस्काउंट म्हणून एक हजार रुपयांची सवलत मिळणार आहे. अशा प्रकारे, ग्राहकांना फोनसाठी फक्त ३४ हजार ९९९ रुपये द्यावे लागतील.
गुगल पिक्सेल ९: फीचर्स
गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये लाँच झालेल्या गुगल पिक्सेल ९ मध्ये अनेक दमदार फीचर्स मिळतात. यात ६.३-इंचाचा OLED डिस्प्ले आहे, जो १२०Hz रिफ्रेश रेट HDR10+ ला सपोर्ट करतो. स्क्रीनला कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस २ प्रोटेक्शन मिळते. अॅल्युमिनियम फ्रेम आणि बॅकसह येणाऱ्या या फोनची जाडी ८.५ मिमी आहे. या फोनमध्ये मागील बाजूस ५० मेगापिक्सेल +४८ मेगापिक्सेल ड्युअल लेन्स देण्यात आला. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी यात १०.५ मेगापिक्सेलचा कॅमेरा मिळतो. ४७०० एमएएच बॅटरीसह येणारा हा फोन रिव्हर्स वायरलेस चार्जिंगला देखील सपोर्ट करतो.
वनप्लसशी स्पर्धा
गुगल पिक्सेल ९ हा फोन भारतीय बाजारात असलेल्या वनप्लस १३ एस 5G शी स्पर्धा करेल. वनप्लसमध्ये ग्राहकांना ६.३-इंच डिस्प्ले मिळतो. यात क्वालकॉमचा सर्वात वेगवान स्नॅपड्रॅगन ८ एलिट चिपसेट आहे. या फोनमध्ये ५० मेगापिक्सेल + ५० मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा देण्यात आला. तसेच यात ५८५० एमएएच बॅटरी आहे. हा फोन सध्या फ्लिपकार्टवर ५२ हजार ७८५ रुपयांना उपलब्ध आहे.