डेटा लीक प्रकरणी फेसबुकला 5 अब्ज डॉलर्सचा दंड
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2019 21:27 IST2019-07-24T21:26:41+5:302019-07-24T21:27:05+5:30
फेडरल ट्रेड कमिशनने फेसबुकवर कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप लावला आहे.

डेटा लीक प्रकरणी फेसबुकला 5 अब्ज डॉलर्सचा दंड
नवी दिल्ली : फेडरल ट्रेड कमिशनने डेटा लीक प्रकरणी सोशल मीडियात लोकप्रिय असलेल्या फेसबुकला 5 अब्ज डॉलर्सचा दंड ठोठावला आहे. प्रायव्हसी ब्रीच आणि केंब्रिज अॅनालिटिका स्कँडलच्या सेटलमेंटसाठी फेसबुकला हा दंड आकारण्यात आला आहे.
फेडरल ट्रेड कमिशनने फेसबुकवर कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप लावला आहे. याशिवाय फेसबुकवर खोटे बोलणे, प्रायव्हसीसोबत समझौता करणे अशाप्रकारे अनेक आरोप फेडरल ट्रेड कमिशनने लावले आहेत. तसेच, फेसबुक युजर्ससोबत फेशियल रिकॉग्निशन संबंधी खोटे बोलत असून हे बाय डिफॉल्ट ऑफ नव्हते, असा आरोप फेडरल ट्रेड कमिशनने केला आहे.
दरम्यान, असे सांगण्यात येत आहे की, फेडरल ट्रेड कमिशनच्या आदेशानंतर आता फेसबुकला थर्ड पार्टी डेव्हलपर्स,जे फेसबुकचा डेटा यूज करतात. त्यांच्या हेतू काय आहे, त्याविषयी सर्टिफिकेशन घेणे गरजेचे असणार आहे.
या तीन मुख्य कारणामुळे फेसबुकला भरावा लागणार दंड...
1) केंब्रिज अॅनालिटीकाला डेटा उल्लंघन.
2) फेशियल रिकॉग्निशन डिफॉल्ट ऑफ असल्याचे खोटे सांगितले.
3) युजर्सकडून फोन नंबर सुरक्षेतेसाठी मागविले आणि त्यानंतर फेसबुकने फोन नंबरचा वापर टार्गेट जाहिरातींसाठी केला.