Facebook वर नवीन फीचर येणार, फेव्हरेट फ्रेंड टॉपवर राहणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2019 03:57 PM2019-05-20T15:57:33+5:302019-05-20T15:58:37+5:30

सोशल मीडिया फेसबुक आपल्या 2 अब्ज 30 कोटी युजर्ससाठी न्यूज फीडमध्ये काही फेरबदल करणार आहे. या बदलानंतर लवकरच युजर्सना त्यांचे खास मित्र-मैत्रिणी त्यांच्या फीडमध्ये टॉपवर दिसणार आहेत.

facebook will now prioritise your close friends on your news feed | Facebook वर नवीन फीचर येणार, फेव्हरेट फ्रेंड टॉपवर राहणार

Facebook वर नवीन फीचर येणार, फेव्हरेट फ्रेंड टॉपवर राहणार

googlenewsNext
ठळक मुद्देफेसबुक आपल्या 2 अब्ज 30 कोटी युजर्ससाठी न्यूज फीडमध्ये काही फेरबदल करणार आहे.बदलानंतर लवकरच युजर्सना त्यांचे खास मित्र-मैत्रिणी त्यांच्या फीडमध्ये टॉपवर दिसणार आहेत. फेसबुकने आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये सर्वेक्षणाच्या आधारे दोन रँकींग अपडेट करण्याची घोषणा केली आहे.

नवी दिल्ली - सोशल मीडिया फेसबुक आपल्या 2 अब्ज 30 कोटी युजर्ससाठी न्यूज फीडमध्ये काही फेरबदल करणार आहे. या बदलानंतर लवकरच युजर्सना त्यांचे खास मित्र-मैत्रिणी त्यांच्या फीडमध्ये टॉपवर दिसणार आहेत. फेसबुकने यासाठी अनेक पोस्टचं सर्वेक्षण केलं आहे. युजर्सना नेमकं काय पाहायला आवडतं. याचा रिसर्च केला. फेसबुकने आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये सर्वेक्षणाच्या आधारे दोन रँकींग अपडेट करण्याची घोषणा केली आहे.

युजर्सच्या आवडीच्या व्यक्तींना यामध्ये प्राधान्य देण्यात आलं असून फेसबुकवर ते टॉपमध्ये दिसणार आहेत. जर एका फोटोमध्ये टॅग केलं जात असेल तर किंवा एखाद्या पोस्टवर कमेंट येत असेल तर फेसबुक पॅटर्न दिसणार आहे. या सर्व गोष्टींचा वापर हा अल्गोरिदम ठरवण्यासाठी केला जाणार आहे. याशिवाय फेसबुक आणखी एका फीचरवर काम करत आहे. फेसबुकने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये युजर्सच्या सुरक्षिततेचा विचार करून आपल्या अ‍ॅपमधून ‘व्यू ऐज पब्लिक’ हे फीचर हटवलं होतं. मात्र कंपनी पुन्हा एकदा या फीचरचा अ‍ॅपमध्ये समावेश करण्याचा विचार करत असल्याची माहिती मिळत आहे. 

Facebook ची 'ही' सुविधा लवकरच होणार बंद 

फेसबुक आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर आणत असतं. मात्र आता फेसबुकने त्यांची एक सुविधा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रुप व्हिडिओ चॅटचा प्रमुख अ‍ॅप 'हाऊसपार्टी' चं एक क्लोन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. द वर्जने दिलेल्या रिपोर्टनुसार,  'बोनफायर' या क्लोनिंग अ‍ॅपच्या माध्यमातून फेसबुकने ही सुविधा युजर्सना उपलब्ध करून दिली होती. मात्र या महिन्यात हे अ‍ॅप बंद करण्याचा निर्णय फेसबुकने घेतला आहे. या अ‍ॅपचं टेस्टिंग फेसबुकने 2017 मध्ये सुरू केलं होतं. 'बोनफायर' हे क्लोन अ‍ॅप मे महिन्यात बंद होणार असल्याची माहिती फेसबुकने दिली आहे.  या अ‍ॅपच्या माध्यमातून ज्या काही चांगल्या गोष्टी आम्हाला शिकता आल्या, त्यांचा उपयोग भविष्यात लाँच होणाऱ्या अन्य गोष्टींसाठी आम्ही करू, असं फेसबुकने म्हटलं आहे. फेसबुकवर 'हाऊसपार्टी' नावाची एक ग्रुप व्हिडिओ चॅटिंग सुविधा आहे. जी ओपन केल्यावर युजर्सना कोण-कोण ऑनलाईन आहे हे कळतं आणि ऑनलाईन असलेल्या हव्या त्या व्यक्तीसोबत व्हिडीओ चॅट करता येतं. फेसबुक इन्स्टाग्राम आणि मेसेंजरसारख्या अन्य प्लॅटफॉर्मवर पण ग्रुप व्हिडीओ चॅटसारखे फीचर जोडत आहे. 

facebook shutting down group video chat app bonfire | Facebook ची

फेसबुकचा लूक लवकरच बदलणार; मार्क झुकेरबर्गने रिलीज केलं नवं डिझाईन

फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्गने फेसबुक डेव्हलपर्स कॉन्फरन्समध्ये फेसबुकच्या नव्या डिझाईनची घोषणा केली आहे. फेसबुकने या नव्या डिझाईनमध्ये लाँच केल्यापासून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील सिग्नेचर ब्लू बॅनर रिमूव्ह करण्यात आला आहे. कंपनीच्या नव्या डिझाईनमध्ये मेसेजिंग अ‍ॅप, ऑनलाईन मार्केट प्लेस आणि व्हिडीओ ऑन डिमांड हे एका बाजूला देण्यात आले आहेत. नवं फीचर युजर्ससाठी प्रायवेट फीड उपलब्ध करण्यासाठी डिझाईन करण्यात आल्याची माहिती  फेसबुकने दिली आहे. फेसबुकच्या नव्या डिझाईनमध्ये युजर्सच्या प्रायव्हसीवर फोकस करण्यात आलं आहे. हे डिझाईन प्रायव्हेट आणि इनक्रिप्टेड म्हणजेच सुरक्षितेसाठी तयार करण्यात आलं आहे. यामुळे कम्युनिकेशन हे जास्त सुरक्षित होणार आहे.

फेसबुक मेसेंजरने करता येणार हॉटेलचं बुकिंग; डेस्कटॉप युजर्सलाही ठरणार फायदेशीर

फेसबुक मेसेंजरचं डेस्कटॉप व्हर्जनसोबतच group viewing नावाचं आणखी एक फीचर यात येणार आहे. मित्रांसोबत व्हिडीओ बघण्यासाठी या फीचरचा वापर करता येणार आहे. तसेच हा  व्हिडीओ सुरू असताना तुम्ही संभाषण देखील करू शकाल. कोणता व्हिडिओ प्लॅटफॉर्म या फीचरला सपोर्ट करणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र यावर काम करत असल्याची माहिती फेसबुकने दिली आहे. चॅटिंग करताना तुमच्यात आणखी उत्साह निर्माण करण्यासाठी फेसबुक मॅसेंजरमध्ये एक डेडीकेटेड स्पेस देण्यावर फेसबुक विचार करत आहे. ज्यामध्ये  तुम्हाला आणि तुमच्या मित्रांना आवडीनुसार कंटेट मिळवता येणार आहे. तसेच तुम्ही काही लोकांनाच दिसू शकेल असा मॅसेज किंवा स्टोरी तयार करू शकाल. फेसबुक बिजनेससाठी मेसेंजरचा उपयोग आणखी रंजक बनवण्यावर फेसबुक भर देत आहे. फेसबुक मेसेंजरमध्ये लवकरच नव्या स्वरूपात जाहिराती झळकतील ज्याचा उपयोग व्यावसायिकांना उत्तम प्रकारे करून घेता येणार आहे. अपॉइंटमेंट हे नवं फीचरसुद्धा यामध्ये अ‍ॅड होणार आहे. ज्यात कोणत्याही हॉटेल मालकाशी बोलून तुम्हाला हॉटेलचं बुकींग करता येणार आहे.

Facebook वर आता आवडीच्या गाण्यासोबत पोस्ट करता येणार 

गाणी ऐकायला अनेकांना आवडतं. काही वेळा आवडीची गाणी सोशल मीडियावर शेअर करून पोस्ट करण्याची इच्छा असते. मात्र प्रत्येक वेळी हे शक्य होतं असं नाही. फेसबुक लवकरच आपल्या युजर्सना अशा पद्धतीची सुविधा देणार आहे. फेसबुक युजर्ससाठी नवनवीन फीचर्स आणत असतं. या सुविधेसाठी फेसबुकने काही भारतीय संगीत कंपनीशी करार केला आहे. कंपनीने टी-सीरीज म्यूझिक, झी म्यूझिक आणि यश राज फिल्म्ससह काही कंपनींसह करार केला आहे. फेसबुकच्या या नव्या फीचरमुळे युजर्सना आपल्या पोस्ट आणि व्हिडीओसोबत गाणं शेअर करण्याची सुविधा मिळणार आहे.

facebook uploaded email contacts of almost 15 lakh user | फेसबुकचा पुन्हा

Facebook अकाऊंटचा पासवर्ड सुरक्षित आहे का?; 'या' सिक्युरिटी टिप्स करतील मदत!

क्रेब्स ऑन सिक्युरिटीने आपल्या अहवालात म्हटले आहे की, फेसबुकने युजर्सचे पासवर्ड प्लेन टेक्स्टच्या स्वरूपात साठवून ठेवले आहेत. ते कंपनीमध्ये काम करणारा एखादा कर्मचारी सहजपणे बाहेर काढू शकतो. त्यामुळे पासवर्डच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरम्यान अशा पद्धतीने युजर्सचे पासवर्ड लीक होणे शक्य नसल्याचे फेसबुकने म्हटले आहे. फेसबुकचे जगभरात कोट्यवधी युजर्स आहेत. एखाद्या युजरने आक्षेपार्ह पोस्ट टाकली तर कंपनीच्या टीमकडून तत्काळ डिलीट केली जाते. 

 

Web Title: facebook will now prioritise your close friends on your news feed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.