Facebook, WhatsApp अन् Instagram चालेना, सोशल मीडियाचं डाऊनलोड बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2019 08:36 PM2019-07-03T20:36:46+5:302019-07-03T20:40:40+5:30

Facebook, WhatsApp आणि Instagram जगभरात अनेक ठिकाणी डाऊन झालं आहे.

Facebook has stopped working properly, at the same time as WhatsApp. | Facebook, WhatsApp अन् Instagram चालेना, सोशल मीडियाचं डाऊनलोड बंद

Facebook, WhatsApp अन् Instagram चालेना, सोशल मीडियाचं डाऊनलोड बंद

Next

नवी दिल्लीः Facebook, WhatsApp आणि Instagram जगभरात डाऊन झालं आहे. गेल्या 15 मिनिटांपासून व्हॉट्सअॅप वापरण्यात अनेकांना अडचणी येत आहेत. व्हॉट्सअॅपवरचे व्हिडीओ आणि फोटो अपलोड होत नसल्याचं अनेकांनी ट्विटरवरून सांगितलं आहे. Facebook, WhatsApp आणि Instagram वापरण्यात अडचणी येत असल्याचा तक्रारी केल्या आहेत. तसेच भारतातले युजर्सही प्रभावित झाले आहेत. युरोप, दक्षिण अमेरिका, जपानसारख्या देशांत Facebook, WhatsApp आणि Instagram वापरण्यात अडथळे येत आहेत. मलेशिया, श्रीलंका आणि इंडोनेशियामध्येही युजर्सना फेसबुक आणि  WhatsApp वापरण्यात अडथळे येत आहेत. 

जगभरातल्या कोट्यवधी लोकांना सध्या याचा अनुभव येत असून, फोटो पाठवण्यासह डाऊनलोडसुद्धा करता येत नाही आहेत. अनेकांनी ट्विटर तसेच इतर सोशल मीडियाच्या माध्यमांवर यासंदर्भात तक्रारी केल्या आहेत.


काही ठिकाणी तर फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सऍपची खिल्ली उडवली जात आहे. दरम्यान, या तिन्ही प्लॅटफॉर्मवर लोकांना अडचणी येत असल्यानं अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.  याप्रकरणी फेसबुककडून कुठलंही स्पष्टीकरण आलेलं नाही.

Web Title: Facebook has stopped working properly, at the same time as WhatsApp.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.