फेसबुकमध्ये सर्वकाही आलबेल नाही! कर्मचाऱ्यांचाही विश्वास गमावला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2018 09:29 PM2018-11-15T21:29:22+5:302018-11-15T21:29:50+5:30

फेसबुकसाठी 2018 हे वर्ष संकटांनी भरलेले गेले आहे.

Facebook Employees lost their faith | फेसबुकमध्ये सर्वकाही आलबेल नाही! कर्मचाऱ्यांचाही विश्वास गमावला

फेसबुकमध्ये सर्वकाही आलबेल नाही! कर्मचाऱ्यांचाही विश्वास गमावला

googlenewsNext

फेसबुकसाठी 2018 हे वर्ष संकटांनी भरलेले गेले आहे. माहितीची चोरी, निवडणुकीमध्ये हस्तक्षेप आदी प्रकरणे कंपनीला चांगलीच शेकलेली असताना आता कर्मचाऱ्यांमध्येही नकारात्मक वातावरण वाढू लागले आहे. वॉल स्ट्रीट जर्नलच्या सर्वेक्षणामध्ये ही धक्कादायक बाब समोर आली आहे. यामध्ये केवळ 52 टक्केच कर्मचारी कंपनीच्या भविष्याबाबत सकारात्मक दिसले आहेत. 


फेसबुक वर्षातून दोनदा कर्मचाऱ्यांचे म्हणणे जाणण्यासाठी अंतर्गत सर्व्हे करते. ही पाहणी एप्रिल आणि ऑक्टोबरमध्ये केली जाते. नुकत्याच झालेल्या सर्व्हेमध्ये कर्मचाऱ्यांना 30 प्रश्न विचारण्यात आले होते. सप्टेंबर 2018 पर्यंतच्या आकड्यांनुसार फेसबुकमध्ये 33606 कर्मचारी काम करतात. 


गेल्या वर्षी 84 टक्के कर्मचारी कंपनीच्या भवितव्याबाबत सकारात्मक होते. एप्रिलमध्ये हाच आकडा 67 टक्क्यांवर आला. पाच महिन्यांत 52 टक्केच कर्मचारी कंपनीबाबत सकारात्मक आहेत. 


फेसबुक जगाला चांगले बनविण्यासाठी योगजदान देत असल्याच्या मतांमध्येही 19 टक्क्यांची घसरण झाली आहे. हा आकडा 53 टक्के आहे. फेसबुकमध्ये काम करण्याचा अभिमान वाटणाऱ्यांची संख्याही 87 टक्क्यावरून 70 टक्क्यांवर आली आहे. 

Web Title: Facebook Employees lost their faith

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.