मुंबई: भारतीय वाहन बाजारात लवकरच मोठी क्रांती पाहायला मिळणार आहे. देशातील आघाडीची केमिकल कंपनी 'हिमाद्री स्पेशालिटी केमिकल्स'ने इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरीसाठी लागणाऱ्या महत्त्वपूर्ण घटकाचे देशातच उत्पादन करण्याची घोषणा केली आहे. कंपनी आता लिथियम आयन फॉस्फेट कॅथोड ॲक्टिव्ह मटेरियल तयार करण्यासाठी जागतिक स्तरावरील कंपन्यांशी चर्चा करत आहे. या प्रकल्पामुळे आगामी काळात इलेक्ट्रिक कार आणि दुचाकींच्या किमतीत मोठी घट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
इलेक्ट्रिक वाहनांच्या एकूण किमतीत बॅटरी पॅकचा वाटा ४० ते ५० टक्क्यांपर्यंत असतो. सध्या भारत या बॅटरी घटकांसाठी मोठ्या प्रमाणावर आयातीवर अवलंबून आहे. हिमाद्री स्पेशालिटी केमिकल्सने देशातच LFP मटेरियल उत्पादित केल्यास बॅटरी निर्मितीचा खर्च लक्षणीयरीत्या कमी होईल. काही तज्ज्ञांच्या मते, यामुळे ईव्हीच्या किमती निम्म्यावर येऊ शकतात.
ओडिशात भव्य प्रकल्पकंपनी ओडिशा येथे वार्षिक २ लाख मेट्रिक टन क्षमतेचा प्लांट उभारणार आहे. यासाठी सुमारे १,१२५ कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. विशेष म्हणजे, चीनच्या बाहेर अशा प्रकारचे उत्पादन करणारा हा जगातील पहिलाच मोठा प्रकल्प ठरू शकतो. आर्थिक वर्ष २०२७ च्या तिसऱ्या तिमाहीपर्यंत या प्लांटचे पहिले युनिट सुरू होण्याचे संकेत आहेत.
LFP बॅटरीचे वैशिष्ट्यLFP बॅटरी सध्याच्या बॅटरीपेक्षा अधिक सुरक्षित मानली जाते. या बॅटरी उष्णता सहन करण्यास सक्षम असून यात आग लागण्याचा धोका कमी असतो. तसेच, या बॅटऱ्यांचे आयुष्य १० वर्षांपेक्षा जास्त असते आणि यात कोबाल्ट किंवा निकेल वापरले जात नसल्याने त्या पर्यावरणास पूरक आहेत.
भविष्यातील उद्दिष्टहिमाद्री स्पेशालिटी केमिकल्सचे व्यवस्थापकीय संचालक अनुराग चौधरी यांनी सांगितले की, पुढील ५ वर्षात १०० GWh क्षमतेच्या बॅटरीसाठी लागणारे LFP मटेरियल पुरवण्याचे त्यांचे लक्ष्य आहे. या प्रकल्पामुळे कंपनीचा नफा २०२८ पर्यंत १,१०० कोटी रुपयांपर्यंत नेण्याचा त्यांचा मानस आहे.
Web Summary : Himadri Speciality Chemicals will produce LFP battery material in India, potentially halving EV prices. A ₹1,125 crore Odisha plant aims for 2 lakh metric tons annual capacity, challenging China's lead. LFP batteries are safer, longer-lasting, and eco-friendly. Company targets ₹1,100 crore profit by 2028.
Web Summary : हिमाद्री स्पेशलिटी केमिकल्स भारत में एलएफपी बैटरी सामग्री का उत्पादन करेगी, जिससे ईवी की कीमतें आधी हो सकती हैं। ₹1,125 करोड़ के ओडिशा प्लांट का लक्ष्य 2 लाख मीट्रिक टन वार्षिक क्षमता है, जो चीन को चुनौती देगा। एलएफपी बैटरी सुरक्षित, अधिक टिकाऊ और पर्यावरण के अनुकूल हैं। कंपनी का लक्ष्य 2028 तक ₹1,100 करोड़ का लाभ है।