शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

ईअरफोन आरोग्यास घातक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 02:47 IST

विविध क्षेत्रात तंत्रज्ञानाने प्रगती केली, हे निश्चितच स्वागतार्ह आहे; पण प्रगतीबरोबर अधोगतही पावलावर पाऊल ठेवून सुरू आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

रीना चव्हाणविविध क्षेत्रात तंत्रज्ञानाने प्रगती केली, हे निश्चितच स्वागतार्ह आहे; पण प्रगतीबरोबर अधोगतही पावलावर पाऊल ठेवून सुरू आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. साधे मोबाइलचे उदाहरण घ्या. आज मोबाइल जगण्यासाठी जणू आवश्यक गोष्ट झालाय. एक वेळ जेवण नसेल तरी चालेल; पण हातात मोबाइल हवा. आपल्या आजूबाजूला नजर फिरवल्यास हातात मोबाइल आणि कानात ईअरफोन घातल्याशिवाय कोणाचे पानच हलत नाही. आजकाल तरुणाईमध्ये कानात ईअरफोन घालणे, हे एक फॅडच झाले आहे; पण सतत कानात हेडफोन वा ईअरफोन घातल्याने ऐकण्याबाबत समस्या भेडसावू शकते. एका संशोधनानुसार, जर एखादी व्यक्ती कानात ईअरफोन घालून दरदिवशी एका तासापेक्षा जास्त वेळ ८० डेसिबलपेक्षा जास्त आवाजात गाणी ऐकत असेल तर त्याला कायमस्वरूपी बहिरेपणाही येऊ शकतो. त्यामुळे ईअरफोन घालून मोठ्या आवाजात गाणे ऐकण्याच्या सवयीला वेळीच मुरड घाला. ईअरफोनच्या दुष्परिणामांबाबत जाणून घेऊ या...>ऐकू कमी येणेकानात सतत ईअरफोन घालून मोठमोठ्याने गाणी ऐकल्याने ऐकण्याची क्षमता ४० ते ५० डेसिबलपर्यंत कमी होऊ शकते. मोठ्या आवाजाच्या सततच्या आघातामुळे कानाच्या पडद्याला त्रास होतो. त्यामुळे ठरावीक काळानंतर दूरचे ऐकण्याची क्षमता कमी होऊ लागते. बहिरेपणही येऊ शकते. संगीताचा आनंद घ्या; पण त्यासाठी मोठाच आवाज कशासाठी? तसेच गाणे ऐकताना मध्येमध्ये ब्रेक घ्या.>कोणत्याही गोष्टीचा आंनद घ्या; पण त्याचा अतिरेक टाळा. ईअरफोनचा वापर कमीत कमी करण्याची सवय अंगी बाळगा. स्वस्तात हेडफोन मिळतात म्हणून घेऊ नका, चांगल्या क्वालिटीच्या ईअरफोन वा हेडफोनचाच वापर करा.>डोक्यावर घातक परिणामईअरफोनमधून निघणारे विद्युत चुंबक लहरी डोक्यातील पेशींवर परिणाम करतात. त्यामुळे कान दुखणे, डोके दुखणे, झोप न येणे, अशा समस्यांना समोरे जावे लागते. आजकाल डोळ्यांची जळजवळ, कमी ऐकू येणे, या समस्यांनी तरुणाई ग्रस्त आहे. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे मोबाइल आणि ईअरफोन. कारण समोरासमोर बोलायला कोणाला वेळ नसतो. मात्र, कानात ईअरफोन टाकून तासन्तास गप्पा मारल्या जातात. मैदानी खेळ सोडून आजकाल लहान मुलेसुद्धा मोबाइलवर गेम खेळताना दिसतात. सतत मोबाइलवर बघत राहिल्याने डोळ्यांनाही आणि ईअरफोनमुळे कानालाही त्रास होतो.>इन्फेक्शनईअरफोन तासन्तास कानात घालून मोठमोठ्या आवाजात गाणी ऐकल्याने कानाला इन्फेक्शन होते. तसेच सतत कानाच्या पडद्यावर मोठ्या आवाजाचा मारा झाल्यास कान सुन्न होऊन ऐकण्याची क्षमता कमी होते. मोठ्या आवाजात गाणी ऐकल्याने मानसिक समस्यांना सामोरे जावेच लागते. तसेच हार्टअटॅक, कॅन्सर यासारख्या समस्यासुद्धा उद्भवतात. तसेच दुसरºयाचा ईअरफोन घातल्यास लगेच कानात घालू नका. सेनिटायझरच्या साहाय्याने पहिल्यांदा ते स्वच्छ करून घ्या.

टॅग्स :technologyतंत्रज्ञान