करोडो मोबाईल यूजर्सना सरकारचा इशारा, चुकूनही 'या' नंबरवरून येणारे कॉल रिसिव्ह करू नका
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 16:19 IST2024-12-25T16:17:20+5:302024-12-25T16:19:35+5:30
सरकार आणि दूरसंचार कंपन्या सायबर फसवणूक आणि ऑनलाइन घोटाळ्यांपासून लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत.

करोडो मोबाईल यूजर्सना सरकारचा इशारा, चुकूनही 'या' नंबरवरून येणारे कॉल रिसिव्ह करू नका
नवी दिल्ली : अलीकडच्या काळात स्मार्टफोनच्या जगात सायबर गुन्ह्यांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. स्कॅमर्स लोकांची फसवणूक करण्यासाठी सतत नवनवीन पद्धती अवलंबत आहेत. सरकार आणि दूरसंचार कंपन्या सायबर फसवणूक आणि ऑनलाइन घोटाळ्यांपासून लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत.
दरम्यान, 120 कोटी मोबाईल युजर्ससाठी सरकारकडून मोठा इशारा देण्यात आला आहे. सरकारने मोबाईल युजर्सना विशिष्ट प्रकारच्या नंबरवरून येणाऱ्या कॉल्सबाबत सावध राहण्यास सांगितले आहे. केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाकडून (DoT) हा इशारा देण्यात आला आहे. दूरसंचार विभागाने मोबाईल युजर्सना आंतरराष्ट्रीय कॉलबाबत सावध राहण्यास सांगितले आहे. याबाबतचे निवेदनही सरकारने मंगळवारी जारी केले.
सरकारने जारी केले निवेदन
दूरसंचार विभागाने (DOT) मंगळवारी अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, मोबाईल सेवा ऑपरेटरना त्यांच्या ग्राहकांच्या जागरूकतेसाठी आंतरराष्ट्रीय कॉल टॅग करण्यास सांगितले आहे. तसेच, आंतरराष्ट्रीय इनकमिंग फेक कॉल प्रिव्हेन्शन सिस्टम 22 ऑक्टोबर रोजी लॉन्च करण्यात आली होती. ही सिस्टम लाँच झाल्यानंतर 24 तासांच्या आत टेम्पर्ड भारतीय फोन नंबरवरून येणारे 1.35 कोटी किंवा 90 टक्के आंतरराष्ट्रीय कॉल स्पॅम कॉल म्हणून ओळखले गेले .
सरकारने मोबाईल युजर्स चेतावणी दिली की, यानंतर स्कॅमर्सनी आपली रणनीती बदलली आणि आता लोकांना फसवणुकीचा बळी बनवण्यासाठी आंतरराष्ट्रीय नंबरवरून कॉल वापरत आहेत. विभागाने म्हटले आहे की, युजर्सना अशा अज्ञात आंतरराष्ट्रीय नंबरवरून येणाऱ्या कॉलला उत्तर देताना किंवा उत्तर देताना सावधगिरी बाळगावी पाहिजे, जे +91 पासून सुरु होत नाहीत. तसेच, दूरसंचार विभागाकडून अशा कॉल्सपासून सावध राहण्यास सांगितले आहे, जे भारत सरकारच्या विभागाकडून असल्याचा दावा करतात.
🚨 ALERT: Beware of International Fraud Calls!
— DoT India (@DoT_India) December 2, 2024
Ruko aur Socho:
👉 Be cautious of numbers like +77, +89, +85, +86, +84, etc.
👉 DoT/TRAI NEVER makes such calls.
Action Lo:
✅ Report suspicious calls on https://t.co/6oGJ6NSQal via Chakshu.
✅ Help DoT block these… pic.twitter.com/6No8DHss3o
दूरसंचार विभागाने यापूर्वीही दिला होता इशारा
याआधीही दूरसंचार विभागाने करोडो मोबाईल युजर्सना आंतरराष्ट्रीय नंबरवरून येणाऱ्या कॉल्सबाबत इशारा दिला आहे. काही दिवसांपूर्वीच एक्सने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत +77, +89, +85, +86, +87, +84 या नंबरवरून येणाऱ्या आंतरराष्ट्रीय कॉलबद्दल सावध राहण्यास सांगितले जाते. युजर्सना इशारा देताना सांगण्यात आले की, दूरसंचार विभाग किंवा ट्रायकडून कोणत्याही मोबाइल युजर्सना कॉल केले जात नाहीत, त्यामुळे जर कोणी असे दावे केले तर ते बनावट कॉल आहेत.