TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2024 17:19 IST2024-11-26T17:09:17+5:302024-11-26T17:19:29+5:30
टीव्ही, ओटीटी क्षेत्रात नवीन संकल्पना आणण्यात आली आहे. जाणून घ्या...

TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
कोरोनाने अनेक गोष्टी एकदम बदलून टाकल्या. अगदी आपल्या सवयींपासून ते आपल्या धारणांपर्यंत सर्वांना छेद देणाऱ्या गोष्टी घडल्या. अनेक क्षेत्रात क्रांतिकारी बदल झाले. यापैकी एक म्हणजे आपली टीव्ही पाहण्याची पद्धत. स्ट्रिमबॉक्स मीडियाचे अनुज गांधी, मायक्रॉमॅक्सचे राहुल शर्मा आणि आघाडीचे उद्योजक निखिल कामत यांनी एकत्र येऊन तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात नवीन क्रांती घडवणारी सेवा आणली आहे. एकदा ही सेवा घेतली की, बाकी अन्य कुठे जाण्याची गरज नाही. यामध्ये TV, OTT आणि AI या सगळ्याचा एकाच ठिकाणी मिळतील, अशी सेवा सुरू होत आहे.
स्ट्रिमबॉक्स मीडियाने आणली आहे DOR
स्ट्रिमबॉक्स मीडिया DOR नावाची नवीन संकल्प घेऊन आले आहेत. यामध्ये बहुतांश ओटीटी प्लॅटफॉर्म एकाच ठिकाणी मिळतात. ही भारतातील पहिली सबस्क्रिप्शन टीव्ही सेवा आहे. यासाठी तुम्हाला यांचा टीव्ही घ्यावा लागेल. एकदा टीव्ही घेतला की, २४ हून अधिक ओटीटी प्लॅटफॉर्म आणि अन्य अॅप तसेच ३०० हून अधिक चॅनल्स एकाच ठिकाणी पाहता येतील किंवा त्याचा अनुभव घेता येऊ शकेल, अशी माहिती देण्यात आली. दोन ते अडीच वर्षांपूर्वी ही संकल्पना डोक्यात आली. यावर काम सुरू केले. त्यानंतर गेल्या वर्षी मायक्रोमॅक्सचे राहुल शर्मा यांची भेट झाली. माझी संकल्पना त्यांना सांगितली. ही संकल्पना दोघांनाही पटली आणि DOR आकारास आली, अशी माहिती स्ट्रिमबॉक्स मीडियाचे अनुज गांधी यांनी या सेवेच्या उद्घाटन कार्यक्रमात दिली.
TV ची किंमत, वैशिष्ट्य काय? सबस्क्रिप्शन कितीचे करायचे?
DOR चे टीव्ही ४३ इंच, ५५ इंच आणि ६५ इंच या तीन साइजमध्ये उपलब्ध आहेत. DORने क्यूएलईडी, फोर के अल्ट्रा एचडी, डॉल्बी ऑडिओ विथ फोर्टी वॉट स्पीकर आणि सोलर रिमोट या सर्व सुविधा एकाच टीव्हीत ऑफर केल्या आहेत. ४३ इंची डोर सबस्क्रिप्शन टीव्ही १ डिसेंबर २०२४ पासून फ्लिपकार्टच्या माध्यमातून उपलब्ध असेल. याचे मासिक सबस्क्रिप्शन शुल्क ७९९ रुपये प्रति महिना असून, टीव्हीची किंमत ९ हजार ९९९ रुपये आहे. (यामध्ये आगाऊ अॅक्टिवेशन शुल्क, एका महिन्याचे सबस्क्रिप्शन शुल्क समाविष्ट आहे) ५५ इंची टीव्हीची किंमत १६ हजार ९९९ रुपये असून, व ६५ इंची टीव्हीची किंमत २४ हजार ९९९ रुपेये आहे. परंतु, हे पर्याय २०२५च्या सुरुवातीला उपलब्ध करून दिले जातील, अशी माहिती देण्यात आली आहे. केवळ फ्लिपकार्ट नाही, तर अन्य ठिकाणीही हे टीव्ही उपलब्ध केले जाणार आहेत. या टीव्हीसोबत DOR ची विशेष OS देण्यात येते.