dont search these things on google to stay safe | Google वर 'या' गोष्टी सर्च करणं पडू शकतं महागात
Google वर 'या' गोष्टी सर्च करणं पडू शकतं महागात

नवी दिल्ली - गुगल हे अत्यंत लोकप्रिय सर्च इंजिन असून यावर लोक अनेक गोष्टी सर्च करत असतात. राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, क्रीडा, बातम्या, फोटो यासह अनेक गोष्टीची संपूर्ण माहिती गुगलच्या एका क्लिकवर अगदी सहज मिळते. मात्र ऑनलाईन फसवणुकीचे प्रमाण हे सध्या वाढले आहे. गुगलवर एखादी वेबसाईट अथवा यूआरएल ओपन करणं महागात पडू शकतं. त्यामुळे गुगलवर एखादी माहिती शोधताना सतर्क असणं गरजेचं आहे. 

गुगलवर बँकेची ऑनलाईन वेबसाईट सर्च करू नका

तुमचं अकाऊंट असलेल्या बँकेची अधिकृत वेबसाईट माहीत नसल्यास ती गुगलवर सर्च करू नका. कारण चुकून जर यासारखीच हुबेहूब दिसणारी एखादी वेबसाईट ओपन करून बँक लॉगिंग आयडी आणि पासवर्ड टाईप केला तर त्यावर युजर्सची सर्व माहिती सेव्ह होते. या माहितीचा चुकीचा वापर केला जाऊ शकतो. तसेच यामुळे बँक खात्यातून पैसे ही काढले जाण्याची शक्यता असते. 

कंपन्यांचा कस्टमर नंबर सर्च करू नका

एखाद्या कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरून कस्टमर नंबर सर्च करा. अन्य ठिकाणांवरून सर्च केल्यास फ्रॉड होण्याची शक्यता असते. फोनच्या माध्यमातून पासवर्ड आणि ओटीपीसारख्या गोष्टी मागितल्या जातात. त्यावेळी कोणालाही आपली वैयक्तिक माहिती देऊ नये.

पर्सनल फायनान्स आणि शेअर मार्केटसंबंधीत माहिती सर्च करू नका 

अधिकृत वेबसाईट माहीत नसल्यास गुगलवर पर्सनल फायनान्स आणि शेअर मार्केटसंबंधीत कोणतीही माहिती सर्च करू नका. कारण यामुळे युजर्सची सुरक्षितता धोक्यात येऊ शकते. 

अ‍ॅप्स आणि सॉफ्टवेअर डाऊनलोड करू नका

गुगलवर थर्ड पार्टी अ‍ॅप डाऊनलोड करणं महागात पडू शकतं. अनेक बोगस अ‍ॅप्स सध्या उपलब्ध आहेत. त्यामुळे युजर्सची माहिती चोरीला जाऊ शकते. तसेच त्याचा चुकीचा वापर केला जाऊ शकतो. गुगलवरून अ‍ॅप्स किंवा सॉफ्टवेअर डाऊनलोड करताना काळजी घ्या. 

Google कडे आहेत युजर्सच्या प्रत्येक ऑनलाईन शॉपिंगचे डिटेल्स

ऑनलाईन शॉपिंग करण्याला अनेकजण प्राधान्य देतात. मात्र फार कमी जणांना माहीत असेल की Google कडे युजर्सच्या प्रत्येक ऑनलाईन शॉपिंगचे डिटेल्स असतात. शॉपिंगच्या बिलची रिसीट आपल्या जी-मेल अकाऊंटवर पाठवून गुगलला याबाबतची माहिती युजर्सचं देत असतात. त्यामुळे या रिसीटच्या माध्यमातून गुगल युजर्सच्या ऑनलाईन शॉपिंगवर नजर ठेवून असतं.  सीएनबीसीच्या रिपोर्टनुसार, युजर्स किती पैसे खर्च करतात याची माहिती गुगलला एका प्रायवेट वेब टूलच्या मदतीने मिळते. मात्र या माहितीचा उपयोग ते जाहिरातीसाठी करत नाहीत. कंपनीने 2017 मध्ये जीमेल मेसेजमधून डेटा एकत्र करून त्याचा वापर हा जाहिरातीसाठी करण्याचं बंद केल्याचं कंपनीने म्हटलं आहे. गुगलने द वर्जला दिलेल्या माहितीनुसार, युजर्सना एकाच जागी त्यांनी केलेली खरेदी,  बुकिंग किंवा सबस्क्रिप्शन सहजपणे दिसण्यासाठी एक प्रायव्हेट डेस्टिनेशन तयार केलं आहे आणि ते फक्त युजर्सना दिसतं. युजर्स ही माहिती कधीही डिलीट करू शकतात असं ही कंपनीने म्हटलं आहे. 
 

Web Title: dont search these things on google to stay safe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.