WhatsApp कॉलवर बोलताय? तुमचं लोकेशन होऊ शकतं ट्रॅक; सुरक्षिततेसाठी ऑन करा 'ही' सेटिंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2025 15:44 IST2025-12-13T15:42:29+5:302025-12-13T15:44:02+5:30
WhatsApp कॉलच्या माध्यमातून तुमचं लोकेशन ट्रॅक केलं जाऊ शकतं.

WhatsApp कॉलवर बोलताय? तुमचं लोकेशन होऊ शकतं ट्रॅक; सुरक्षिततेसाठी ऑन करा 'ही' सेटिंग
WhatsApp कॉलच्या माध्यमातून तुमचं लोकेशन ट्रॅक केलं जाऊ शकतं. तुमच्यासोबत असं कोणी करू नये यासाठी WhatsApp ने देखील उपाययोजना केली आहे, परंतु अनेक लोकांना एपमध्ये उपलब्ध असलेल्या या उपयुक्त फीचरची माहिती नाही. हे फीचर बाय डिफॉल्ट बंद असतं, पण सुरक्षितता जपण्यासाठी ते ऑन असणं आवश्यक आहे. कॉलद्वारे तुमचं लोकेशन ट्रॅक होण्यापासून वाचवणारं फीचर कसं ऑन करू शकता हे जाणून घ्या...
WhatsApp कॉलवर बोलत असताना कॉलद्वारे तुमचं लोकेशन कोणताही हॅकर किंवा स्कॅमर ट्रॅक करू नये, यासाठी तुम्ही WhatsApp च Protect IP Address in Calls हे फीचर नक्की ऑन ठेवा.
- सर्वात आधी WhatsApp ओपन करा.
- यानंतर तुम्हाला बाजूला दिसत असलेल्या तीन डॉट्सवर क्लिक करावे लागेल.
- तीन डॉट्सवर टॅप केल्यानंतर, तुम्हाला एपच्या सेटिंग्जमध्ये जावे लागेल.
- सेटिंग्जमध्ये गेल्यानंतर तुम्हाला प्रायव्हसीचा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.

- प्रायव्हसी पर्यायामध्ये एडव्हान्स पर्यायात जा. येथे तुम्हाला Protect IP Address in Calls हे फीचर मिळेल, जे बाय डिफॉल्ट बंद असेल.
- तुम्ही हे फीचर ऑन (On) करून तुमच्या WhatsApp अकाउंटची सुरक्षा मजबूत करू शकता. हे फीचर ऑन झाल्यानंतर तुमचे सर्व WhatsApp कॉल्स कंपनीच्या सर्व्हरद्वारे जातील, ज्यामुळे कोणीही ते ट्रॅक करू शकणार नाही.
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
WhatsApp युजर्ससाठी कंपनीने अनेक नवीन फीचर्स आणले आहेत. जर तुम्ही WhatsApp वापरत असाल, तर येत्या काही दिवसांत तुम्हाला एकापेक्षा एक चांगले फीचर्स मिळणार आहेत. उदाहरणार्थ, जर समोरच्या व्यक्तीने तुमचा कॉल उचलला नाही, तर आता तुम्ही त्याला 'व्हॉइस किंवा व्हिडिओ नोट पाठवून कॉल उचलण्यास सांगू शकता. हे फीचर आयफोनसारखं आहे, जिथे व्हॉइस मेल पाठवण्याची सुविधा दिली जाते. याव्यतिरिक्त, ग्रुप कॉल स्पीकर आणि डेस्कटॉप युजर्ससाठी नवीन मीडिया टॅब आणला गेला आहे.