तुम्हाला माहितीये तुमच्या स्मार्टफोनमध्ये WiFi Calling कसं सुरू करायचं?; पाहा प्रक्रिया

By जयदीप दाभोळकर | Published: July 28, 2021 03:57 PM2021-07-28T15:57:04+5:302021-07-28T15:59:24+5:30

सध्या आपल्याकडे अनेक स्मार्टफोन्स हे WiFi Calling या फीचरसह येतात. देशातील काही दूरसंचार कंपन्या WiFi Calling च्या सुविधेचाही लाभ देतात. 

Do you know how to start WiFi Calling in your smartphone See process vodafone idea airtel reliance jio | तुम्हाला माहितीये तुमच्या स्मार्टफोनमध्ये WiFi Calling कसं सुरू करायचं?; पाहा प्रक्रिया

तुम्हाला माहितीये तुमच्या स्मार्टफोनमध्ये WiFi Calling कसं सुरू करायचं?; पाहा प्रक्रिया

Next
ठळक मुद्देसध्या आपल्याकडे अनेक स्मार्टफोन्स हे WiFi Calling या फीचरसह येतात.देशातील काही दूरसंचार कंपन्या WiFi Calling च्या सुविधेचाही लाभ देतात. 

WiFi Calling : सध्या बहुतांश स्मार्टफोन्स हे वायफाय कॉलिंगला सपोर्ट करतात. आपल्या पैकी काही जणांना वायफाय कॉलिंग काय आहे याची कल्पना असेल. परंतु काहींना या सुविधेमुळे होणारे लाभ कदाचित माहित नसतील. परंतु तुमच्या स्मार्टफोनमध्ये वायफाय कॉलिंगची सुविधा असेल तर तुम्ही नक्कीच त्याचा लाभ घ्यायला हवा. अँड्रॉईड आणि आयओएसच्या बहुतांश डिव्हाईसेमध्ये ही सुविधा उपलब्ध असते. सध्या देशात रिलायन्स जिओ, एअरटेल या कंपन्या बहुतांश ठिकाणी, तर व्होडाफोन आयडिया ही कंपनी काही ठिकाणी ग्राहकांना वायफाय कॉलिंगची सुविधा देत आहे. हे स्मार्टफोनमधील एक इनबिल्ट फिचर असून तुम्हाला केवळ ते अॅक्टिव्हेट करायचं आहे. 

iPhone युझर्सना सर्वप्रथन फोनच्या सेटिंग्समध्ये जावं लागेल आणि त्यानंतर मोबाईल नेटवर्कमध्ये वायफाय कॉलिंगचा ऑप्शन अनेबल करावा लागेल. यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये वायफाय कॉलिंग सुरू होईल. तर अँड्रॉईड फोन युझर्सनाही आपल्या मोबाईलच्या सेटिंग्समधील नेटवर्क या ऑप्शनमध्ये जाऊन वायफाय कॉलिंग अनेबल करावं लागेल. 

Wi-Fi Calling ही अशाप्रकारची एक इंटिग्रेटेड सेवा आहे जी तुमच्या घरचं ब्रॉडबँड, ऑफिस ब्रॉडबँड किंवा पब्लिक वायफायसारख्या ठिकाणी इंटरनेटचा वापर करून व्हॉईस कॉलिंग करण्याची किंवा रिसिव्ह करण्याची सेवा देतं. या सेवेचा वापर करताना तुम्हाला तुमच्या मोबाईलवर नेटवर्क नसतानाही कॉलिंग सुविधेचा लाभ घेता येऊ शकतो. 

कसं कराल सेटिंग ऑन?
सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनच्या सेटिंग्समध्ये जावं लागेल. त्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या Wi-Fi and Internet या ऑप्शनवर क्लिक करावं लागेल. 

त्यानंतर तुम्हाला SIM and network मध्ये जावं लागेल. त्यानंतर तुम्हाला सीमकार्ड १ मध्ये किंवा २ मध्ये कोणत्या ठिकाणी हा ऑप्शन अनेबल करावं लागेल हे सिलेक्ट करावं लागेल. ही पद्धत तुम्हाला अँड्रॉईड स्मार्टफोनसाठी वापरता येईल. 

iOS बद्दल सांगायचं झालं तर तुमच्या फोनच्या सेटिंग्समध्ये जा. त्यानंतर मोबाईल डेटा या ऑप्शनवर क्लिक करा. 
त्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या Primary Sim किंवा eSim वर क्लिक करा. त्यानंतर त्या ठिकाणी असलेला वायफाय कॉलिंगचा ऑप्शन अनेबल करा. तुमचा मोबाईव वायफाय कॉलिंगला सपोर्ट करतो की नाही हे पाहण्यासाठी तुम्हाला तुमच्या सर्व्हिस प्रोव्हायरच्या वेबसाईटला भेट द्यावी लागेल. 

Read in English

Web Title: Do you know how to start WiFi Calling in your smartphone See process vodafone idea airtel reliance jio

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app