ना कॉल करू शकत, ना चॅट! 'या' चुका केल्या तर तुमचं WhatsApp अकाऊंट कायमचं होईल बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 17:29 IST2025-01-15T17:28:30+5:302025-01-15T17:29:02+5:30
WhatsApp : फेब्रुवारी महिन्यातच भारतात ७६ लाखांहून अधिक अकाऊंट बंद करण्यात आली. अशा परिस्थितीत, तुमचं अकाऊंट कोणत्या कारणांमुळे बंद केलं जाऊ शकतं त्याबाबत जाणून घेऊया...

ना कॉल करू शकत, ना चॅट! 'या' चुका केल्या तर तुमचं WhatsApp अकाऊंट कायमचं होईल बंद
जगभरातील कोट्यवधी लोक प्रसिद्ध मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp वापरत आहेत. पण दरमहा लाखो अकाऊंट देखील बॅन केली जात आहेत. अकाऊंट बॅन करण्यामागे अनेक कारणं आहेत. मेसेजिंग App नुसार, यावर्षी फेब्रुवारी महिन्यातच भारतात ७६ लाखांहून अधिक अकाऊंट बंद करण्यात आली. अशा परिस्थितीत, तुमचं अकाऊंट कोणत्या कारणांमुळे बंद केलं जाऊ शकतं त्याबाबत जाणून घेऊया...
बरेच युजर्स अधिकृत WhatsApp वापरण्याऐवजी थर्ड-पार्टी अॅप्स वापरतात. अशा परिस्थितीत, WhatsApp Delta, GBWhatsApp आणि WhatsApp Plus सारख्या नावांनी अनेक App उपलब्ध आहेत. पण कंपनी या अॅप्सच्या वापरावर बंदी घालते. जर तुम्ही हे थर्ड-पार्टी App वापरत असाल तर तुमचे अकाउंट बॅन केलं जाऊ शकतं.
दुसऱ्याची ओळख वापरणं
जर तुम्ही दुसऱ्याचं नाव, प्रोफाइल फोटो आणि ओळखपत्र वापरून मेसेज करत असाल तर तुमचं WhatsApp अकाऊंट देखील बॅन केलं जाऊ शकतं. असं करणं देखील WhatsApp च्या कम्युनिटी गाईडलाइन्सचं उल्लंघन मानलं जातं. तुम्ही कोणत्याही सेलिब्रिटी, ब्रँड किंवा संस्थेची ओळख वापरल्यास तुमचं अकाऊंट ब्लॉक केलं जाऊ शकतं.
कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये नसलेल्या नंबरवर मेसेज पाठवणे
जर तुम्ही दिवसभर अशा लोकांना मेसेज करत असाल जे तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये नाहीत, तर तुमचे मेसेज स्पॅम मानला जाऊ शकतो. अशा परिस्थितीत तुमचे अकाऊंट बंद केलं जाईल.
रिपोर्ट केल्यावर बंद होईल अकाऊंट
जर अनेक युजर्सनी तुमचं अकाऊंट रिपोर्ट केलं असेल तर कंपनी तुमच्यावर कारवाई करू शकते. कंपनी तुमचं अकाऊंट बंद करू शकते. रिपोर्ट करणारी व्यक्ती तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टचा भाग आहे की नाही याने फरक पडणार नाही.
इतरांना त्रास दिल्यास कारवाई
जर तुम्ही एखाद्याला त्रास देण्याच्या किंवा धमकी देण्याच्या उद्देशाने मेसेज पाठवले तर तुमचं अकाऊंट बंद केलं जाईल. याशिवाय, प्रक्षोभक, द्वेषपूर्ण किंवा आक्षेपार्ह मेसेज पाठवल्याबद्दल तुमच्यावर कारवाई देखील केली जाऊ शकते.