शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

'या' कंपनीकडून स्वस्तात मिळतंय Disney+Hotstar; अवघ्या 50 ​​रुपयांत होईल काम

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2022 6:00 PM

Disney + Hotstar : ऑफर अंतर्गत, तुम्हाला डेटा व्हाउचरसह Disney + Hotstar चे सब्सक्रिप्शन मोफत मिळत आहे. 

नवी दिल्ली : Disney + Hotstar हे जगभरातील लोकप्रिय OTT प्लॅटफॉर्मपैकी एक आहे. तुम्ही या लोकप्रिय OTT प्लॅटफॉर्मचा अॅक्सेस फक्त 151 रुपयांमध्ये मिळवू शकता. या किंमतीवर, तुम्हाला तीन महिन्यांसाठी Disney + Hotstar चे सब्सक्रिप्शन मिळेल. एवढेच नाही तर तुम्हाला यासोबत डेटाही मिळेल. 

आयपीएल सीझनमध्ये जवळपास 50 रुपये मासिक खर्चात तुम्ही या OTT प्लॅटफॉर्मचे सब्सक्रिप्शन मिळवू शकता. मात्र, हा काही सब्सक्रिप्शन प्लॅन नाही, जो तुम्ही OTT प्लॅटफॉर्मच्या वेबसाइटवरून थेट खरेदी करू शकता. दरम्यान, व्होडाफोनआयडिया (Vodafone Idea )आपल्या युजर्संना ही ऑफर देत आहे. याऑफर अंतर्गत, तुम्हाला डेटा व्हाउचरसह Disney + Hotstar चे सब्सक्रिप्शन मोफत मिळत आहे. 

व्होडाफोनआयडियाने अलीकडेच अनेक 4G डेटा व्हाउचर जाहीर केले आहेत. यापैकी एक Disney + Hotstar सब्सक्रिप्शन असलेले 151 रुपयांचे व्हाउचर देखील आहे. यामध्ये यूजर्सना 8GB डेटा मिळतो. हे डेटा व्हाउचर असल्यामुळे युजर्संना फक्त 4G डेटा मिळतो. यामध्ये व्हॉईस कॉलिंग किंवा एसएमएसचे फायदे उपलब्ध नाहीत. याची व्हॅलिडिटी 30 दिवसांची आहे. यासह, कंपनी Disney+ Hotstar चे सब्सक्रिप्शन कॉम्प्लिमेंटरी ऑफर म्हणून देत आहे. सब्सक्रिप्शनला अॅक्टिव्हेट करण्यासाठी युजर्संना कोणतेही अतिरिक्त चार्ज देण्याची गरज नाही.

डेटा देखील मिळेलया प्लॅनची ​​किंमत 151 रुपये आहे, ज्यामध्ये तुम्हाला तीन महिन्यांसाठी Disney + Hotstar सबस्क्रिप्शन मिळेल. म्हणजेच एका महिन्यासाठी तुम्हाला जवळपास 50.33 रुपये खर्च करावे लागतील. यासोबतच तुम्हाला 8GB डेटा देखील मिळत आहे. जर तुम्हाला कमी किमतीत OTT प्लॅटफॉर्मचे सब्सक्रिप्शन घ्यायचे असेल तर तुम्ही 82 रुपयांचे डेटा व्हाउचर वापरू शकता. यामध्ये यूजर्संना Sony LIV चे सब्सक्रिप्शन मिळत आहे. 82 रुपयांच्या डेटा व्हाउचरमध्ये युजर्संना 4GB डेटा मिळेल, जो 14 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह येतो. तसेच, Sony LIV चे सबस्क्रिप्शन 28 दिवसांसाठी मिळेल.

टॅग्स :Mobileमोबाइलtechnologyतंत्रज्ञानVodafoneव्होडाफोनIdeaआयडिया