सिलेंडर बुकिंगसाठी 'हा' मेसेज आलाय? क्लिक करण्यापूर्वी थांबा! क्षणार्धात होऊ शकते बँक खाते रिकामे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 13:03 IST2026-04-01T13:00:38+5:302026-04-01T13:03:52+5:30

देशातील LPG सिलेंडरच्या तुटवड्याचा फायदा सायबर चोरटे घेत आहेत. गॅस बुकिंगच्या नावाखाली होणाऱ्या स्कॅमपासून वाचण्यासाठी सरकारने काही सल्ले दिले आहेत.

Did you get this message for cylinder booking? Wait before clicking! Your bank account could be empty in an instant | सिलेंडर बुकिंगसाठी 'हा' मेसेज आलाय? क्लिक करण्यापूर्वी थांबा! क्षणार्धात होऊ शकते बँक खाते रिकामे

सिलेंडर बुकिंगसाठी 'हा' मेसेज आलाय? क्लिक करण्यापूर्वी थांबा! क्षणार्धात होऊ शकते बँक खाते रिकामे

इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर सध्या देशात एलपीजी सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाला असून अनेक शहरांमध्ये गॅससाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत. मात्र, सर्वसामान्यांच्या याच हतबलतेचा फायदा आता सायबर भामट्यांनी घ्यायला सुरुवात केली आहे. गॅस सिलेंडरच्या बुकिंगच्या नावाखाली लोकांची वैयक्तिक माहिती आणि बँक खात्यातील पैसे लंपास केले जात असल्याचे धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. या वाढत्या फसवणुकीची दखल घेत केंद्र सरकारने आता नागरिकांसाठी महत्त्वाची ॲडव्हायजरी जारी केली आहे.

पॅनिक मेसेजचा असा होतोय वापर!

'इंडियन सायबर क्राईम कॉर्डिनेशन सेंटर' (I4C) नुसार, सायबर चोरटे सध्या लोकांच्या मोबाईलवर पॅनिक मेसेज पाठवत आहेत. "तुमच्या सिलेंडरचे बुकिंग रद्द झाले आहे, त्वरित खालील लिंकवर क्लिक करून पुन्हा बुक करा" किंवा "पेमेंट करा आणि तात्काळ घरपोच डिलिव्हरी मिळवा" अशा आशयाचे मेसेज पाठवून लोकांना जाळ्यात ओढले जात आहे. गॅसटंचाईमुळे घाबरलेले नागरिक घाईघाईत या लिंक्सवर क्लिक करतात आणि आपली गोपनीय माहिती चोरट्यांच्या हवाली करतात.

कशी होतेय तुमची फसवणूक?

१. फेक लिंक्स आणि ॲप्स: व्हॉट्सॲप किंवा एसएमएसद्वारे बनावट वेबसाईटच्या लिंक्स पाठवल्या जातात, ज्या हुबेहूब गॅस कंपन्यांच्या वेबसाईटसारख्या दिसतात.

२. QR कोड स्कॅम: पेमेंट करण्यासाठी क्यूआर कोड पाठवला जातो, जो स्कॅन करताच तुमच्या खात्यातून पैसे वजा होतात.

३. डिस्काउंटच्या आमिष: गॅस टंचाईच्या काळात स्वस्त दरात सिलेंडर देण्याचे आमिष दाखवून लोकांकडून आगाऊ रक्कम उकळली जात आहे.

असा करा बचाव

अधिकृत प्लॅटफॉर्मचाच वापर करा: गॅस सिलेंडरचे बुकिंग नेहमी गॅस कंपनीच्या अधिकृत वेबसाईट, मोबाईल ॲप किंवा ओळखीच्या एजन्सीच्या नंबरवरूनच करा.

अनोळखी लिंक टाळा: अनोळखी नंबरवरून आलेल्या कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका किंवा संशयास्पद APK फाईल्स डाऊनलोड करू नका.

गोपनीयता पाळा: तुमचा ओटीपी, पिन नंबर किंवा बँक डिटेल्स कधीही कोणाशीही शेअर करू नका. गॅस कंपन्या कधीही फोनवर अशी माहिती मागत नाहीत.

घाई करू नका: "त्वरीत पेमेंट करा अन्यथा गॅस मिळणार नाही" असे दडपण आणणाऱ्या मेसेजवर विश्वास ठेवू नका.

Web Title : सिलेंडर बुकिंग के लिए फर्जी संदेशों से सावधान रहें; बैंक खाते खतरे में!

Web Summary : साइबर अपराधी फर्जी बुकिंग संदेश भेजकर गैस की कमी का फायदा उठा रहे हैं। ये घोटाले व्यक्तिगत और बैंकिंग विवरण चुराने के लिए नकली लिंक, क्यूआर कोड और छूट प्रस्तावों का उपयोग करते हैं। आधिकारिक प्लेटफॉर्म का उपयोग करके और संदिग्ध लिंक से बचकर खुद को सुरक्षित रखें।

Web Title : Beware of fake cylinder booking messages; bank accounts at risk!

Web Summary : Cybercriminals are exploiting gas shortages by sending fake booking messages. These scams use fake links, QR codes, and discount offers to steal personal and banking details. Protect yourself by using official platforms and avoiding suspicious links.