शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

स्वदेशी कंपनीनं केली कमाल; 12 हजारांच्या आत शानदार Smart TV, 25 हजार मुव्हीज मोफत 

By सिद्धेश जाधव | Updated: February 22, 2022 13:05 IST

Daiwa Smart TVs चे नवीन दोन मॉडेल भारतीयांच्या भेटीला आले आहेत. यांची किंमत 11, 990 रुपयांपासून सुरु होते.  

स्वदेशी कंपनी Daiwa नं आपल्या स्मार्ट टीव्ही पोर्टफोलियोमध्ये वाढ केली आहे. कंपनीनं बजेट सेगमेंटमध्ये Cloud TV प्लॅटफॉर्मवर आधारित दोन टीव्ही लाँच केले आहेत. यातील Daiwa 32-inch (D32SM9) स्मार्ट टीव्हीची किंमत 11990 रुपये ठेवण्यात आली आहे. तर Daiwa 39-inch (D40HDR9L) मॉडेल 17,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल.  

हे दोन्ही मॉडेल HD Ready आहेत. 500 रुपये जास्त देऊन Voice Assistant सपोर्ट असलेले व्हेरिएंट विकत घेता येतील. हे दोन्ही स्मार्ट टीव्ही एक वर्षाच्या वॉरंटीसह येतात. कंपनी टीव्ही पॅनल्सवर एक वर्षाची अतिरिक्त वॉरंटी देखील देत आहे. तुम्ही daiwa.in सह ऑफलाईन रिटेल स्टोर्सवरून यांची खरेदी करू शकता.  

स्पेसिफिकेशन्स 

Daiwa HD Ready Smart TV अँड्रॉइड 9 आधारित CloudTV OS वर चालतात. त्यामुळे यात Cloud TV Voice Assistant मिळतो, जो टीव्ही-रिमोटमधील बिल्ट-इन माईकच्या मदतीने वापरता येईल. यात The BIGWALL इंटरफेस देण्यात आला आहे. सोबत Amazon Prime Video, Disney+, Hotstar, Zee5, SonyLiv आणि Sun NXT सारखे लोकप्रिय स्ट्रीमिंग अ‍ॅप्स मिळतात. या टीव्हीमधील मुव्ही बॉक्स अ‍ॅप विविध भाषांमधील 25 हजारांपेक्षा जास्त चित्रपट मोफत बघता येतील.  

Daiwa चे दोन्ही स्मार्ट टीव्ही HD Ready डिस्प्लेसह येतात, जो 1366 x 768 पिक्सल रिजोल्यूशन, A+ Grade Panel, Quantum Luminit Technology आणि 16.7 मिलियन कलरला सपोर्ट करतो. साऊंडसाठी कंपनीनं 20W स्टीरियो सराऊंड स्पिकर्सचा वापर केला आहे. हे दोन्ही टीव्ही A-53 क्वॉड-कोर प्रोसेसरवर चालतात. सोबत 1GB RAM आणि 8GB स्टोरेज मिळते. या टीव्हीमध्ये दोन HDMI पोर्ट, दोन USB पोर्ट, Wi-Fi, ईथरनेट आणि ऑप्टिकल आऊटपुट मिळतो.  

हे देखील वाचा:

टॅग्स :Televisionटेलिव्हिजनtechnologyतंत्रज्ञान