डिजिटल अरेस्ट/ऑनलाईन फसवणुकीवर लगाम; UPI अ‍ॅप्समध्ये लवकरच येणार ‘फ्रीज बटण’

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 15:25 IST2026-01-22T15:24:07+5:302026-01-22T15:25:13+5:30

Cyber Crime: याद्वारे तुमचे बँक खाते तात्काळ सुरक्षित केले जाईल.

Cyber Crime, Digital arrest and online fraud will be stopped ,'Freeze button' to be introduced in UPI apps | डिजिटल अरेस्ट/ऑनलाईन फसवणुकीवर लगाम; UPI अ‍ॅप्समध्ये लवकरच येणार ‘फ्रीज बटण’

डिजिटल अरेस्ट/ऑनलाईन फसवणुकीवर लगाम; UPI अ‍ॅप्समध्ये लवकरच येणार ‘फ्रीज बटण’

Cyber Crime: डिजिटल अरेस्ट आणि ऑनलाईन फसवणुकीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने मोठी तयारी सुरू केली आहे. लवकरच UPI आणि बँकिंग अ‍ॅप्समध्ये ‘फ्रीज’ किंवा ‘किल स्विच’ बटण आणले जाईल. या एका बटणाने युजर्सचे सर्व बँक व UPI व्यवहार तात्काळ थांबवले जातील, जेणेकरुन फसवणूक आणि आर्थिक नुकसान टाळणे शक्य होईल.

काय आहे ‘फ्रीज’ बटण?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, गृह मंत्रालय UPI आणि बँकिंग अ‍ॅप्समध्ये ‘फ्रीज’/‘किल स्विच’ बटण देण्यावर विचार करत आहे. या बटणावर टॅप करताच सर्व UPI आणि बँक पेमेंट्स एकाचवेळी फ्रीज होतील, कोणताही फंड ट्रान्सफर तात्काळ थांबेल आणि संबंधित बँकांना तात्काळ अलर्ट जाईल. युजर्स फसवणुकीची शंका येताच हे बटण दाबून आपले खाते सुरक्षित करू शकतो.

बँक आणि कुटुंबीयांना अलर्ट

या सुविधेत पेमेंट थांबवण्यासोबतच बँक आणि कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचा पर्यायही असणार आहे. यामुळे जोखमीचे व्यवहार वेळीच रोखता येतील. सरकारचा उद्देश एक अलर्ट-आधारित प्रणाली विकसित करण्याचा आहे, जी खाते फ्रीज करण्यासोबतच संबंधित संस्थांना सूचित करेल.

इन्शुरन्स फसवणुकीवरही कारवाई

डिजिटल अरेस्टसोबतच इन्शुरन्स क्षेत्रातील फसवणुकीवरही सरकार लक्ष केंद्रीत करत आहे. बनावट पद्धतीने इन्शुरन्स रक्कम काढण्याचे प्रकार रोखण्यासाठी कठोर पावले उचलली जाऊ शकतात. यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक ने ‘डिजिटल पेमेंट प्रोटेक्शन फंड’चा प्रस्तावही मांडला आहे. कोणतीही फसवणूक ही सिस्टम-वाइड जोखीम म्हणून पाहिली जावी, केवळ युजर्सची चूक म्हणून नाही, असे मत RBI ने व्यक्त केले आहे.

Web Title : ऑनलाइन धोखाधड़ी रोकने के लिए UPI ऐप्स में मिलेगा 'फ्रीज बटन'

Web Summary : डिजिटल गिरफ्तारी और ऑनलाइन धोखाधड़ी से निपटने के लिए, UPI ऐप्स में जल्द ही 'फ्रीज' बटन होगा। यह उपयोगकर्ताओं को तुरंत लेनदेन रोकने, बैंकों और परिवार को सतर्क करने और वित्तीय नुकसान को रोकने की अनुमति देगा। बीमा धोखाधड़ी पर भी ध्यान दिया जा रहा है।

Web Title : UPI Apps to Get 'Freeze Button' to Curb Online Fraud

Web Summary : To combat digital arrests and online fraud, UPI apps will soon feature a 'freeze' button. This allows users to halt transactions immediately, alerting banks and family, preventing financial losses. Insurance fraud is also under scrutiny.