WhatsApp वर सायबर हल्ला, Meta नं दिली पुष्टी; पत्रकारांसह अनेकांचे अकाऊंट हॅक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 13:58 IST2025-02-03T13:58:04+5:302025-02-03T13:58:40+5:30

हल्लेखोरांनी निवडक लोकांना शिकार बनवले आहे. हे ९० लोक २० वेगवेगळ्या देशातील आहेत. 

Cyber attack on WhatsApp, Meta confirms; Accounts of many including journalists hacked | WhatsApp वर सायबर हल्ला, Meta नं दिली पुष्टी; पत्रकारांसह अनेकांचे अकाऊंट हॅक

WhatsApp वर सायबर हल्ला, Meta नं दिली पुष्टी; पत्रकारांसह अनेकांचे अकाऊंट हॅक

प्रसिद्ध सोशल मीडिया अ‍ॅप WhatsApp वर हॅकर्सनं सायबर हल्ला केला आहे. या हॅकिंगसाठी झिरो क्लिक टेक्निकचा वापर करण्यात आला असल्याचं META कडून पुष्टी देण्यात आली आहे. यामुळे WhatsApp युजर्स सायबर गुन्हेगारांच्या टार्गेटवर आले आहेत. या हल्ल्यामागे Paragon च्या सर्विलांस सॉफ्टवेअरचा वापर केला असून त्याचं नाव Graphite असं आहे. या सायबर हल्ल्यात जवळपास ९० लोक जाळ्यात अडकल्याचे मेटानं सांगितले आहे.

एन्क्रिप्टे मॅसेजिंग App कडून सांगण्यात आलंय की, या सायबर हल्ल्यात ९० लोकांना शिकार बनवण्यात आले आहे. त्यात पत्रकार आणि अनेक मोठे व्यक्ती यांचा समावेश आहे. अद्याप याची डिटेल्स माहिती समोर आली नाही. हल्लेखोरांनी  निवडक लोकांना शिकार बनवले आहे. हे ९० लोक २० वेगवेगळ्या देशातील आहेत. 

झिरो क्लिक हल्ल्याने शिकार

Paragon Solution चं Graphite झिरो क्लिक टेक्निकवर काम करते. त्याचा अर्थ विना क्लिक करता ते तुमच्या डिवाईसमध्ये पोहचते आणि डेटा चोरी करते. मोबाईल धारकांना या घुसखोरीची कल्पनाही नसते. या सायबर हल्ल्यानंतर Gmail कडूनही युजर्सला सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. सध्या जीमेलचे २५०० कोटी युजर्स आहेत. Gmail वर अनेक सेंसेटिव्ह डिटेल्स असतात जे चोरी झाल्यास हॅकर्स बँक खातेही खाली करू शकतात. 

दरम्यान, अलीकडेच पॅरागॉन सोल्युशन्सची यूएस इमिग्रेशन अँड कस्टम्स एन्फोर्समेंट सोबत २ मिलियन डॉलरचे कॉन्ट्रक्टची चौकशी करण्यात आली. वायर्डच्या मते, स्पायवेअरच्या वापरावर निर्बंध घालणाऱ्या बायडेन प्रशासनाच्या नियमाचे पालन होत आहे याची खात्री करण्यासाठी करार थांबवण्यात आला होता असं WhatsApp ने सांगितले. 

Web Title: Cyber attack on WhatsApp, Meta confirms; Accounts of many including journalists hacked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.