आयफोन १७ प्रो मॅक्सच्या 'या' कलरची क्रेझ; विक्री सुरू होण्याआधीच आउट ऑफ स्टॉक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 16:32 IST2025-09-17T16:30:32+5:302025-09-17T16:32:25+5:30
अॅपलने त्याची आयफोन १७ सिरीज ९ सप्टेंबर रोजी लॉन्च केली, ज्यात आयफोन १७, आयफोन एअर, आयफोन १७ प्रो आणि आयफोन १७ प्रो मॅक्सचा समावेश आहे.

आयफोन १७ प्रो मॅक्सच्या 'या' कलरची क्रेझ; विक्री सुरू होण्याआधीच आउट ऑफ स्टॉक!
अॅपलने त्याची आयफोन १७ सिरीज ९ सप्टेंबर रोजी लॉन्च केली, ज्यात आयफोन १७, आयफोन एअर, आयफोन १७ प्रो आणि आयफोन १७ प्रो मॅक्सचा समावेश आहे. दरम्यान, आयफोन १७ प्रो मॅक्स हा मॉडेल कॉस्मिक ऑरेंज रंगाच्या पर्यायासह लॉन्च झाला आहे. बुकिंग सुरू झाल्यापासून तीन दिवसांतच हा मॉडेल भारत आणि अमेरिकेत आउट ऑफ स्टॉक झाला आहे. आयफोन १७ मालिकेची विक्री १९ सप्टेंबरपासून सुरू होईल.
१२ सप्टेंबरपासून सुरू झालेल्या प्री-ऑर्डरच्या आधारे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे की, आयफोन १७ प्रो मॅक्स आयफोन १७ सिरीजमध्ये सर्वाधिक विकला जाईल. अॅपलने गेल्या वर्षीच्या तुलनेत त्याचे उत्पादन ६० टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला. आयफोन १७ प्रो मॅक्समध्ये अँटी-रिफ्लेक्टीव्ह आणि प्रोमोशन टेक्नोलॉजीसह ६.९-इंच डिस्प्ले देण्यात आला आहे. यात 48MP+48MP+48MP ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप मिळतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यात १८ मेगापिक्सेलचा सेंटर-स्टेज फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
अहवालांनुसार, ग्राहक मोठ्या प्रमाणात आयफोन १७ प्रो मॅक्सच्या कॉस्मिक ऑरेंज कलरचा पर्याय निवडत आहेत, ज्यामुळे हा कलर आउट ऑफ स्टॉक झाला आहे. हा कलर भारतातील कोणत्याही अॅपल स्टोअरमध्ये उपलब्ध नाही. त्याचप्रमाणे, अॅपलच्या वेबसाइटवरून प्रो मॅक्स मॉडेल्स पिकअपसह प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध नाहीत. भारतात आयफोन १७ प्रो मॅक्सची सुरुवाती किंमत १ लाख ४९ हजार ९०० पासून सुरू होतो. तर, २ टीबी व्हेरिएंटची किंमत २ लाख २९ हजार ९०० रुपये आहे.
आयफोन १६ प्रो आणि आयफोन १६ प्रो मॅक्सच्या किंमती पडल्या
आयफोन १७ सीरिज लॉन्च झाल्यानंतर आयफोन १६ मालिकेतील मॉडेलच्या किंमती पडल्या आहेत. सध्या अॅमेझॉनवर आयफोन १६ प्रोच्या २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंटवर मोठी सूट मिळत आहे. त्याची मूळ किंमत १ लाख २९ हजार ९०० रुपये आहे. परंतु, अॅमेझॉनवर आयफोन १६ सध्या १ लाख १७ हजार ९०० उपयांमध्ये उपलब्ध आहे. म्हणजेच, ग्राहक २५६ जीबी मॉडेल १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटच्या किंमतीत खरदी करू शकतात. शिवाय, आयफोन १६ प्रो मॅक्सच्या खरदीवरही ग्राहकांना मोठी सूट मिळत आहे. या मॉडेलची मूळ किंमत १ लाख ४४ हजार ९०० रुपये आहे. परंतु, अॅमेझॉनवर हा मॉडेल फक्त १ लाख ३२ हजार ९०० रुपयांमध्ये उपलब्ध आहे.