शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
2
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
3
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
4
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
5
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
6
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
7
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
8
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
9
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
10
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
11
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
12
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
13
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
14
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
15
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
16
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
17
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
18
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
19
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
20
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  

CoronaVirus: कोरोना काळ! Reliance Jio ची मोठी घोषणा; मोफत कॉलिंग आणि रिचार्ज मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2021 14:26 IST

CoronaVirus Pandemic Reliance Jio offer 300 free minutes jio phone users: समाजातील मोठा वर्ग मोबाईलद्वारे संपर्कात रहावा, यासाठी ही ऑफर देत असल्याचे कंपनीने म्हटले आहे. रिलायन्स फाऊंडेशन लोकांना मोबाईल नेटवर्कसोबत जोडून ठेवण्यासाठी रिलायन्स जिओसोबत मिळून काम करत आहे. 

Reliance Jio Corona Period Offer: कमी कालावधीत देशातील सर्वात मोठी झालेली टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने (Reliance Jio) जिओफोन ग्राहकांसाठी मोठी घोषणा केली आहे. कोरोनाच्या संकटात देश अडकलेला आहे, यामुळे या काळात जेवढ्याचे रिचार्ज केले जाईल तेवढ्याचे रिचार्ज त्या महिन्यासाठी जिओ मोफत देणार आहे. तसेच बिना रिचार्ज करता जिओफोन ग्राहक दररोज 10 मिनिटे मोफत (free calling minutes) बोलू शकणार आहेत. यानुसार जिओ महिन्याला 300 रुपयांची मोफत आउटगोईंग सेवा देणार आहे. (Reliance Jio Friday launched two special initiatives. 300 free minutes of outgoing calls per month or 10 minutes per day. additional recharge plan of the same value for free. )

या काळात इनकमिंग कॉल पहिल्यासारखेच मोफत राहणार आहेत. कंपनीच्या घोषणेनुसार ही ऑफर कोरोना महामारीच्या काळात सुरु राहणार आहे. जिओफोन ग्राहकांना याचा फायदा मिळणार आहे. देशातील अधिकांश राज्यांमध्ये लॉकडाऊन लागलेला आहे. अशावेळी मोबाईल रिचार्ज करणे कठीण बनले आहे. ज्या लोकांना ऑनलाईन रिचार्ज येत नाही, किंवा जे वयस्कर आहेत त्यांच्यासाठी मोबाईल रिचार्ज करणे कठीण जाणार आहे. यामुळे या त्रासातून बाहेर काढण्यासाठी जरी रिचार्ज केले नाही तरी देखील कंपनी दिवसाला 10 मिनिटे आऊटगोईंग सुविधा मोफत देणार आहे. यामुळे अडचणीच्या काळात आपल्यांशी संवाद साधणे, मदत मिळविणे सोपे होणार आहे. 

समाजातील मोठा वर्ग मोबाईलद्वारे संपर्कात रहावा, यासाठी ही ऑफर देत असल्याचे कंपनीने म्हटले आहे. 

रिचार्ज करणाऱ्यांसाठी काय? जे जिओफोन ग्राहक मोबाईल रिचार्ज करू शकतात त्यांच्यासाठी देखील जिओने मोठी ऑफर सुरु केली आहे. जेवढा प्लॅन घ्याल तेवढाच अतिरिक्त प्लॅन त्या मुदतीसाठी वापरता येणार आहे. समजा तुम्ही जिओ फोन ग्राहक आहात, आणि तुम्ही 75 रुपयांचा 28 दिवसांचा प्लॅन रिचार्ज केला तर तुम्हाला 75 रुपयांचा आणखी एक प्लॅन मोफत दिला जाणार आहे. तुम्ही रिचार्ज केलेला प्लॅन वापरून संपला की दुसरा मोफत प्लॅन तुम्हाला वापरता येणार आहे. रिलायन्स फाऊंडेशन लोकांना मोबाईल नेटवर्कसोबत जोडून ठेवण्यासाठी रिलायन्स जिओसोबत मिळून काम करत आहे.  

टॅग्स :Reliance Jioरिलायन्स जिओRelianceरिलायन्सMobileमोबाइल