CoronaVirus: कोरोना काळ! Reliance Jio ची मोठी घोषणा; मोफत कॉलिंग आणि रिचार्ज मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2021 02:25 PM2021-05-14T14:25:21+5:302021-05-14T14:26:12+5:30

CoronaVirus Pandemic Reliance Jio offer 300 free minutes jio phone users: समाजातील मोठा वर्ग मोबाईलद्वारे संपर्कात रहावा, यासाठी ही ऑफर देत असल्याचे कंपनीने म्हटले आहे. रिलायन्स फाऊंडेशन लोकांना मोबाईल नेटवर्कसोबत जोडून ठेवण्यासाठी रिलायन्स जिओसोबत मिळून काम करत आहे. 

CoronaVirus Pandemic: Reliance Jio offers 300 free calling minutes, additional recharge for JioPhone users | CoronaVirus: कोरोना काळ! Reliance Jio ची मोठी घोषणा; मोफत कॉलिंग आणि रिचार्ज मिळणार

CoronaVirus: कोरोना काळ! Reliance Jio ची मोठी घोषणा; मोफत कॉलिंग आणि रिचार्ज मिळणार

Next

Reliance Jio Corona Period Offer: कमी कालावधीत देशातील सर्वात मोठी झालेली टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने (Reliance Jio) जिओफोन ग्राहकांसाठी मोठी घोषणा केली आहे. कोरोनाच्या संकटात देश अडकलेला आहे, यामुळे या काळात जेवढ्याचे रिचार्ज केले जाईल तेवढ्याचे रिचार्ज त्या महिन्यासाठी जिओ मोफत देणार आहे. तसेच बिना रिचार्ज करता जिओफोन ग्राहक दररोज 10 मिनिटे मोफत (free calling minutes) बोलू शकणार आहेत. यानुसार जिओ महिन्याला 300 रुपयांची मोफत आउटगोईंग सेवा देणार आहे. (Reliance Jio Friday launched two special initiatives. 300 free minutes of outgoing calls per month or 10 minutes per day. additional recharge plan of the same value for free. )


या काळात इनकमिंग कॉल पहिल्यासारखेच मोफत राहणार आहेत. कंपनीच्या घोषणेनुसार ही ऑफर कोरोना महामारीच्या काळात सुरु राहणार आहे. जिओफोन ग्राहकांना याचा फायदा मिळणार आहे. देशातील अधिकांश राज्यांमध्ये लॉकडाऊन लागलेला आहे. अशावेळी मोबाईल रिचार्ज करणे कठीण बनले आहे. ज्या लोकांना ऑनलाईन रिचार्ज येत नाही, किंवा जे वयस्कर आहेत त्यांच्यासाठी मोबाईल रिचार्ज करणे कठीण जाणार आहे. यामुळे या त्रासातून बाहेर काढण्यासाठी जरी रिचार्ज केले नाही तरी देखील कंपनी दिवसाला 10 मिनिटे आऊटगोईंग सुविधा मोफत देणार आहे. यामुळे अडचणीच्या काळात आपल्यांशी संवाद साधणे, मदत मिळविणे सोपे होणार आहे. 


समाजातील मोठा वर्ग मोबाईलद्वारे संपर्कात रहावा, यासाठी ही ऑफर देत असल्याचे कंपनीने म्हटले आहे. 


रिचार्ज करणाऱ्यांसाठी काय? 
जे जिओफोन ग्राहक मोबाईल रिचार्ज करू शकतात त्यांच्यासाठी देखील जिओने मोठी ऑफर सुरु केली आहे. जेवढा प्लॅन घ्याल तेवढाच अतिरिक्त प्लॅन त्या मुदतीसाठी वापरता येणार आहे. समजा तुम्ही जिओ फोन ग्राहक आहात, आणि तुम्ही 75 रुपयांचा 28 दिवसांचा प्लॅन रिचार्ज केला तर तुम्हाला 75 रुपयांचा आणखी एक प्लॅन मोफत दिला जाणार आहे. तुम्ही रिचार्ज केलेला प्लॅन वापरून संपला की दुसरा मोफत प्लॅन तुम्हाला वापरता येणार आहे. 
रिलायन्स फाऊंडेशन लोकांना मोबाईल नेटवर्कसोबत जोडून ठेवण्यासाठी रिलायन्स जिओसोबत मिळून काम करत आहे. 
 

Web Title: CoronaVirus Pandemic: Reliance Jio offers 300 free calling minutes, additional recharge for JioPhone users

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.