coronavirus cognizant give 25 percent extra basic pay to employees due to corona outbreak SSS | Coronavirus : कंपनी असावी तर अशी! एप्रिलमध्ये 'या' कर्मचाऱ्यांना मिळणार 25 टक्के जास्त पगार

Coronavirus : कंपनी असावी तर अशी! एप्रिलमध्ये 'या' कर्मचाऱ्यांना मिळणार 25 टक्के जास्त पगार

नवी दिल्ली - वेगाने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसने जगालाच विळखा घातला आहे. जगातील सर्वच क्षेत्रांना कोरोनाचा फटका बसला आहे. त्यामुळे जगाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. मात्र याच दरम्यान आयटी क्षेत्रातील एका प्रसिद्ध कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी एक खूशखबर आहे. कर्मचाऱ्यांच्या कामावर खूश झाल्याने कंपनीने त्यांना  25 टक्के जास्त पगार देण्याचा निर्णय घेतला आहे. कॉग्निझंट या आयटी कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना एप्रिल महिन्यामध्ये 25 टक्के जास्त पगार देण्याची घोषणा केली आहे.

कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतरही कर्मचाऱ्यांनी कंपनीचे काम सुरू ठेवल्याने त्यावर व्यवस्थापनाने समाधान व्यक्त केले आहे. तसेच कर्मचाऱ्यांच्या कामावर खूश होऊन त्यांना जास्त पगार देण्यात येत आहे. कंपनीच्या या निर्णयाचा भारतातील 1 लाख ३० हजार कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. कॉग्निझंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी ब्रायन हमफ्रीज यांनी कर्मचाऱ्यांना एक पत्र लिहिलं आहे. यामध्ये 'भारत आणि फिलिपिन्समध्ये सेवा देणाऱ्या आमच्या कर्मचाऱ्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेले कौतुकास्पद आहे. त्यामुळेच या देशांमधील सहाय्यक आणि त्या स्तरावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बेसिक सॅलरीच्या 25 टक्के अतिरिक्त रक्कम एप्रिल महिन्याच्या पगारामध्ये देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे' असं म्हटलं आहे.


जगभरात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जे प्रयत्न केले जात आहेत. त्याला आमचा पाठिंबा आहे असंही ब्रायन यांनी म्हटलं आहे. तर सर्वच कंपन्यांप्रमाणे कॉग्निझंटलाही कोरोनाचा फटका बसला आहे. लंडन, मुंबई, मिलान अशा प्रमुख शहरांमध्ये कंपनीच्या प्रोडक्टची मागणी आणि पुरवठा दोघांवरही परिणाम झाल्याची माहिती कंपनीने दिली आहे. फेसबुकनेही काही दिवसांपूर्वी आपल्या कर्मचाऱ्यांना बोनस देण्याची घोषणा केली आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी फेसबुक कर्मचाऱ्यांना 1 हजार डॉलर्सचा बोनस देणार आहे. फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग यांनी ही घोषणा केली. 

फेसबुकमध्ये 45 हजार कर्मचारी काम करतात. या प्रत्येक कर्मचाऱ्याला फेसबुक एप्रिलमध्ये 1 हजार डॉलर्सचा बोनस देणार आहे. याशिवाय कर्मचाऱ्यांचा अर्धवाषिक आढावा घेताना सर्वांना इक्सिड रेटिंग देण्यात येईल. त्यामुळे येत्या काही दिवसांत फेसबुककडून कर्मचाऱ्यांना आणखी मोठा बोनस दिला जाऊ शकतो. कोरोनामुळे कार्यालयात येऊ न शकणाऱ्या, कोरोनाची बाधा झालेल्या कर्मचाऱ्यांनादेखील कंपनी बोनस देणार आहे. याशिवाय कंपनीनं सिएटल आणि बे एरियातल्या कर्मचाऱ्यांना घरातूनच काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या

Coronavirus : त्यांचा तो प्रवास ठरला अखेरचा, गावाकडे निघालेल्या 13 जणांचा मृत्यू

Coronavirus : धक्कादायक! दारुची दुकानं बंद असल्याने 5 जणांची आत्महत्या

Coronavirus : लॉकडाऊनचे तीन तेरा! खरेदीसाठी नागरिकांची झुंबड

Coronavirus: चिंताजनक! भारतात एका दिवसात कोरोनाचे १९४ रुग्ण आढळले; कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली

 

Web Title: coronavirus cognizant give 25 percent extra basic pay to employees due to corona outbreak SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.