चालता फिरत फ्रिज जणू; कुठेही मिळवा थंडगार पाणी, हिवाळ्यात पाणी गरम देखील करणार  

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2022 19:35 IST2022-04-12T19:35:44+5:302022-04-12T19:35:52+5:30

उन्हाळ्यात थंड पाणी सर्वांना हवं असतं परंतु आपण जिथे जाऊ तिथं थंडगार पाणी मिळेलच असं नाही. परंतु यावर एक पोर्टेबल उपाय आहे.  

Cooler And Heater Smart Cup Mini Car Portable Refrigerator By Hoox Know Price   | चालता फिरत फ्रिज जणू; कुठेही मिळवा थंडगार पाणी, हिवाळ्यात पाणी गरम देखील करणार  

चालता फिरत फ्रिज जणू; कुठेही मिळवा थंडगार पाणी, हिवाळ्यात पाणी गरम देखील करणार  

दरवर्षी उन्हाळ्यातील तापमान वाढत आहे. त्यामुळे कितीही महत्वाचं काम असलं तरी घरातून बाहेर पडावं वाटत नाही. घरात किंवा ऑफिसमध्ये मिळणारी सावलीच नव्हे तर थंडगार पाण्याचा अभाव देखील बाहेर जाणवतो. आज आम्ही तुम्हाला एका कुठेही नेता येईल अशा छोट्याश्या फ्रिजची माहिती देणार आहोत. जो Portable Fridge आहे आणि 1,500 रुपयांपेक्षा कमी किंमतीत विकत घेता येईल.  

Portable Fridge 

Hoox Smart Cup Mini Car Refrigerator अ‍ॅमेझॉनवर खूप स्वस्तात उपलब्ध आहे. हे एक छोटासा फ्रिज आहे, ज्याची क्षमता 500 एमएल इतकी आहे. या कपमध्ये तुमचं पेय काही सेकंदात थंड होईल. हा फ्रिज फक्त 12V च्या पावरवर चालतो आणि हा तुम्ही कोणत्याही कारच्या पावर सोर्समध्ये प्लग करू शकता. हा मिनी फ्रिज तुमचं पेय थंड तर करतोच. तसेच यात पेय गरम करण्याची देखील सुविधा आहे.  

या Car Refrigerator च्या मदतीनं +/- 5 डिग्री सेल्सियसपर्यंत ड्रिंक थंड करता येईल. तसेच 55 डिग्री सेल्सियलपर्यंतची हीट देखील जेनरेट करता येईल. कंपनीनं यात कि Semiconductor Peltier टेक्नॉलॉजीचा वापर केला आहे. यावर कूल मोड निळ्या तर हॉट मोडसाठी एक लाल एलईडी इंडिकेटर आहे.  

किंमत  

या पोर्टेबल फ्रिजची मूळ किंमत 3,999 रुपये आहे परंतु अ‍ॅमेझॉनवर हा 63% डिस्काउंटनंतर 1,499 रुपयांमध्ये विकला जात आहे. सोबत बँक ऑफर्स, कॅशबॅक आणि पार्टनर ऑफर देखील मिळतील. 

Web Title: Cooler And Heater Smart Cup Mini Car Portable Refrigerator By Hoox Know Price