डीएसएलआरला टक्कर! २०२५ मध्ये गाजले 'हे' टॉप ५ सेल्फी फोन; क्वालिटी पाहून तुम्हीही व्हाल थक्क!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 14:44 IST2025-12-06T14:43:52+5:302025-12-06T14:44:44+5:30
या वर्षात अनेक कंपन्यांनी असे फोन बाजारात आणले, ज्यांच्या फ्रंट कॅमेऱ्याने चक्क डीएसएलआरच्या स्तराची फोटोग्राफी करण्याचा अनुभव दिला आहे.

डीएसएलआरला टक्कर! २०२५ मध्ये गाजले 'हे' टॉप ५ सेल्फी फोन; क्वालिटी पाहून तुम्हीही व्हाल थक्क!
Year Ender 2025 : २०२५ हे वर्ष जर कोण्या एका फीचरमुळे चर्चेत राहिले असेल, तर ते म्हणजे स्मार्टफोनचा सेल्फी कॅमेरा. या वर्षात अनेक कंपन्यांनी असे फोन बाजारात आणले, ज्यांच्या फ्रंट कॅमेऱ्याने चक्क डीएसएलआरच्या स्तराची फोटोग्राफी करण्याचा अनुभव दिला आहे. मोठे सेन्सर, ॲडव्हान्स एआय प्रोसेसिंग आणि हाय रिझोल्यूशन लेन्सच्या मदतीने सेल्फी तंत्रज्ञान आता पूर्वीपेक्षा कितीतरी पटीने शक्तिशाली झाले आहे. जर, तुम्ही खऱ्या अर्थाने प्रीमियम सेल्फी फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर २०२५ मध्ये लाँच झालेल्या 'या' टॉप ५ मॉडेल्समधील एकाची नक्की निवड करू शकता.
आयफोन १७ प्रो मॅक्स
या वर्षातील सर्वात पॉवरफुल सेल्फी कॅमेरा फोनमध्ये पहिले नाव अॅपल आयफोन १७ प्रो मॅक्सचे येते. यात १८ मेगापिक्सेलचा अपग्रेडेड ट्रू डेप्थ कॅमेरा देण्यात आला आहे, जो अत्यंत शार्प आणि नैसर्गिक सेल्फी क्लिक करतो. तर, मागे ४८ मेगापिक्सेलचा ट्रिपल कॅमेरा सेटअप आणि ४एक्स ऑप्टिकल झूम मिळतो. 'ए १९ प्रो' चिपसेटमुळे या फोनचा परफॉर्मेंस खूपच स्मूद झाला आहे. ४८२३mAh बॅटरी आणि २५W वायरलेस चार्जिंगसह हा फोन एक प्रीमियम फ्लॅगशिप ठरला आहे.
गुगल पिक्सेल १० प्रो
गुगलचा पिक्सेल १० प्रो हा फोन त्याच्या दमदार कम्प्युटेशनल फोटोग्राफीसाठी नेहमीच फोटोग्राफी प्रेमींचा आवडीचा राहिला आहे. यात ४२ मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा आणि गुगलची स्किन टोन ऑप्टिमायझेशन टेक्नॉलॉजी वापरली गेली आहे, ज्यामुळे फोटो खूप रियलिस्टिक आणि डिटेल्ससह येतात. ३३०० निट्सची पीक ब्राइटनेस असलेला LTPO OLED डिस्प्ले याला प्रीमियम ऑल-राऊंडर बनवतो.
ओप्पो फाइंड एक्स ९ प्रो
ओप्पो फाइंड एक्स ९ प्रोमध्ये दिलेला कॅमेरा सेल्फीच्या क्वालिटीत कोठेही तडजोड करत नाही. यामध्ये ५० मेगापिक्सेलचा अल्ट्रा-हाय क्वालिटी सेल्फी कॅमेरा आहे, जो क्रिस्टल-क्लियर आउटपुट देतो. मागचा २०० मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा सेटअप प्रो-फोटोग्राफीसाठी उत्तम आहे. डायमेनसीटी ९५०० चिपसेट आणि मोठी ७५००mAh बॅटरी याला एक पॉवरफुल फोन बनवते.
सॅमसंग गॅलेक्सी एस २५ अल्ट्रा
सॅमसंग गॅलेक्सी एस २५ अल्ट्रा सेल्फी प्रेमींच्या पहिल्या पसंतीपैकी एक आहे. यातील १२ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा नंबरमध्ये कमी वाटला तरी, एआय एन्हांसमेंट आणि नाईट मोडमुळे उत्कृष्ट आउटपुट देतो. मागचा २०० मेगापिक्सेलचा सुपर शार्प सेन्सर आणि स्नॅपड्रॅगन ८ एलिट प्रोसेसरमुळे हा परफॉर्मेंसच्या बाबतीतही शक्तिशाली ठरतो. ६.९-इंचचा डायनामिक एमोलेड २ एक्स डिस्प्ले व्हिडीओ आणि कंटेंट क्रिएशनसाठी दमदार आहे.
व्हिवो एक्स ३०० प्रो
व्हिवो एक्स ३०० प्रो. या फोनने २०२५ वर्षाच्या टॉप सेल्फी लिस्टमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. ५० मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आणि Zeiss ऑप्टिक्सच्या मदतीने हा फोन अल्ट्रा-प्रोफेशनल सेल्फी आउटपुट देतो. यात २०० मेगापिक्सेल सेन्सर असलेला रियर सेटअप आणि डायमेनसीटी ९५०० प्रोसेसर देण्यात आला आहे, ज्यामुळे हा एक उत्कृष्ट फोटोग्राफी फोन ठरतो.