ChatGPT, 'डीपसीक'ला गुगल धक्का देणार! Gemini 2.0 एआय टूल अपडेट झाले, आता कामे होणार सोपी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 12:37 IST2025-02-06T12:36:20+5:302025-02-06T12:37:49+5:30
Google Gemini 2.0 आजपासून वापरकर्त्यांना नवीन रुपात मिळणार आहे. गुगलने आपल्या नवीन मॉडेलला लाँच केले आहे.

ChatGPT, 'डीपसीक'ला गुगल धक्का देणार! Gemini 2.0 एआय टूल अपडेट झाले, आता कामे होणार सोपी
Google Gemini 2.0 : सध्या जगभरात एआयने मोठा धुमाकुळ घातला आहे. सुरुवातीला चॅट जीपीटी आले. त्यानंतर गुगलनेही Gemini लाँच केले. तर दुसरीकडे आता चीनमधील एका कंपनीने डीपसीक लाँच केले आहे, डीपसीकचे जगभरात वापरकर्ते मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. दरम्यान, आता गुगलच्या जेमीनीमध्ये मोठे बदल करुन अपडेट करण्यात आले आहेत.
फोक्सवॅगननंतर आता किया इंडिया, भारताचा १३.५ अब्ज रुपयांचा कर चोरला, नोटीस येताच म्हणतेय...
गुगलने आर्टिफिशियल इंटेलिजेंस मॉडेल जेमिनी 2.0 ( Google Gemini ) आजपासून सर्व वापरकर्त्यांसाठी उपलब्ध करून दिले आहे. यासोबतच, गुगलने त्यांचे नवीन मॉडेल देखील लाँच केले आहे. हे मॉडेल आता वापरकर्त्यांची कामे सोपी करणार आहे. गुगलचे नवीन अपडेट चॅटजीपीटी आणि डीपसीक सारख्या इतर एआय प्लॅटफॉर्मला स्पर्धक असेल.
सामान्य वापरासाठी Gemini 2.0 फ्लॅश, अॅडव्हान्स कोडिंग आणि गुंतागुंतीच्या कामांसाठी 2.0 प्रो एक्सपेरिमेंटल आणि कमी किमतीच्या अॅप्लिकेशन्स तयार करण्यासाठी 2.0 फ्लॅश-लाइट. सर्व मॉडेल्स आता जेमिनी अॅप, गुगल एआय स्टुडिओ आणि व्हर्टेक्स एआय प्लॅटफॉर्मद्वारे वापरता येणार आहेत.
अनेक गोष्टी सोप्या होणार
गुगलचे हे आतापर्यंतचे अपडेटेड मॉडेल आहे, जेमिनी 2.0 प्रो एक्सपेरिमेंटल, क्वांटम अल्गोरिदमची करण्यासारखी कामे सहज आणि अचूकपणे करू शकते. हे मॉडेल गुगल सर्चमध्ये एकत्रित होऊ शकते आणि कोड थेट कार्यान्वित करू शकते.
स्टॅन्डर्ड जेमिनी 2.0 ( Google Gemini ) फ्लॅश मॉडेल याआधी सर्वांसाठी उपलब्ध नव्हते. पण, आजपासून ते सर्वांना वापरता येणार आहे. हे मॉडेल डिसेंबरमध्ये लाँच झाले होते. जेमिनी 2.0 फ्लॅश आता मजकूर, फोटो, ऑडिओ आणि व्हिडीओ एकाच वेळी प्रक्रिया करण्यास आणि समजून घेण्यास सक्षम आहे, यामुळे ते मल्टीमीडिया-आधारित एप्लिकेशनसाठी योग्य आहे. याची नैसर्गिक भाषा प्रक्रिया क्षमता प्रगत करण्यात आली आहे. यामुळे ती अवघड वाक्ये आणि भाषिक बारकावे सहजपणे समजू शकते.