शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
3
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
18
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
19
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
20
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत

CES 2019: सिगारेट सोडायला मदत करणारा 'लायटर'... सगळंच लय भारी!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2019 3:45 PM

लास वेगासमधील 'कस्टमर इलेक्ट्रॉनिक शो'मध्ये लेबननच्या एका कंपनीनं आपल्या आगळ्यावेगळ्या आविष्काराची - 'स्मार्ट सिगारेट लायटर'ची झलक दाखवली.

ठळक मुद्देसिगारेटपासून दूर राहण्यासाठी च्युइंग गम, ई-सिगारेट्स, हिप्नोटिझम असे काही मार्ग आहेत.सिगारेट सोडायला मदत करणारा एक लायटर लेबननच्या कंपनीने बनवलाय.हा लायटर 'डाएट प्लॅन'सारखा 'स्मोकिंग प्लॅन' तयार करतो.

नववर्षाचे काही संकल्प अगदी न चुकता केले जातात. सिगारेट सोडण्याचा संकल्प हा त्यापैकीच एक. '१ जानेवारीपासून एकदम बंद हं, लॉक किया जाए' अशा गर्जना बरीच मंडळी करतात. पण, ३ किंवा ४ जानेवारीपर्यंतच कुठेतरी माशी शिंकते आणि सिगारेट पुन्हा सुरू होते. हे व्यसन आरोग्यासाठी हानीकारक असल्याचं कळतं, पण वळत नाही. सिगारेटपासून दूर राहण्यासाठी च्युइंग गम, ई-सिगारेट्स, हिप्नोटिझम असे काही मार्ग आहेत. काही जण त्याचा आधारही घेतात. काही जणांना त्याचा फायदाही होतो, पण बरेच जण नव्याचे नऊ दिवस संपले की जुन्याच मार्गाने जाऊ लागतात. अशांसाठी आता एक 'स्मार्ट लायटर' आशेची ज्योत' ठरू शकतो. हा लायटर सिगारेट पेटवण्याचं काम करता-करता हे व्यसन सोडवायलाही मदत करणार आहे. 

लास वेगासमधील 'कस्टमर इलेक्ट्रॉनिक शो'मध्ये लेबननच्या एका कंपनीनं आपल्या आगळ्यावेगळ्या आविष्काराची - 'स्मार्ट सिगारेट लायटर'ची झलक दाखवली. त्याचं नामकरण 'स्लायटर' असं करण्यात आलंय. तुम्ही किती सिगारेट ओढता, साधारण किती वेळाने ओढता, याचं एक गणित बांधून हा लायटर 'डाएट प्लॅन'सारखा 'स्मोकिंग प्लॅन' तयार करतो. त्या प्लॅनपेक्षा जास्त सिगारेट ओढायला गेल्यास 'स्लायटर' पेटतच नाही. हळूहळू 'स्मोकिंग प्लॅन'मधील सिगारेटची संख्या कमी-कमी होत जाते आणि सिगारेट व्यसनाच्या विळख्यातून आपली सुटका होऊ शकते. 

'स्लायटर'मध्ये जमा झालेला डेटा आपण अ‍ॅपद्वारे मित्रांना, कुटुंबीयांना पाठवू शकतो. त्याद्वारे व्यसनमुक्तीसाठी आपण करत असलेले प्रयत्न त्यांना कळू शकतील, त्यांचीही मदत मिळू शकेल. सिगारेट कमी केल्यानं किती पैसे वाचले हेही अ‍ॅपवर समजू शकेल. ही बचतही आपल्याला प्रेरणादायी ठरू शकते.     'स्लायटर'चं काम भारी आहेच, पण त्याचा लुकही लय भारी आहे. त्यावरच्या छोट्या डिस्प्लेमध्ये, किती वेळा लायटर पेटवला त्याची माहिती आणि इतर डेटाही दिसतो. अर्थात, हा लायटर घेतला की व्यसनमुक्ती झाली, असं नक्कीच नाही. त्यासाठी मनोनिग्रह महत्त्वाचा आहेच. पण, सिगारेट सोडायची तुमची प्रामाणिक इच्छा असेल तर हा 'स्लायटर' तुम्हाला नक्कीच मार्ग दाखवेल. त्याची किंमत १२९ डॉलर्स असून जुलै २०१९ पर्यंत तो बाजारात उपलब्ध होईल.    

टॅग्स :CES 2019सीईएसtechnologyतंत्रज्ञानSmokingधूम्रपान