शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

सावधान...! स्मार्टफोनच्या वापरामुळे मुलांचे दात तुटले; 9 मुले एम्समध्ये दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2019 13:32 IST

जर तुमच्या मुलाला स्मार्टफोनचे व्यसन लागले असेल तर सावध व्हा. त्यांना फोन वापरण्यापासून रोखा. अन्यथा त्यांचे दात तुटू शकतात.

स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे डोळे खराब होत असल्याचे माहिती होते. मात्र, अशा घटना घडल्या आहेत की स्मार्टफोन वापरताना लहान मुलांचे दात तुटले आहेत. होय, भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स)नेच हा अहवाल दिला आहे. यामुळे पालकांना मुलांना मोबाईल देताना अधिक काळजी घ्यावी लागणार आहे. 

जर तुमच्या मुलाला स्मार्टफोनचे व्यसन लागले असेल तर सावध व्हा. त्यांना फोन वापरण्यापासून रोखा. अन्यथा त्यांचे दात तुटू शकतात. ओठही फाटू शकतात. यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती करावे लागू शकते. एम्सच्या दंत चिकित्सा विभागाने हा इशारा दिला आहे. लहान मुलांना फोनचे व्यसन लागले असल्यास ती झोपून मोबाईलवर खेळ खेळत असतात. अशावेळी तोंडावर मोबाईल असतो. एका मोबाईलचे वजन 170 ते 250 ग्रॅम असते. यामुळे हे फोन मुलांच्या हातातून निसटल्यास थेट तोंडावर पडतात. यामुळे मुलांचे दात तुटतात. तसेच ओठही फाटतात. अशाप्रकारे दात तुटल्याच्या नुकत्याच 9 घटना समोर आल्या आहेत. या मुलांना एम्समध्ये भरती करण्यात आले होते. यातील काहींच्या ओठांवर टाके घालून शस्त्रक्रिया करावी लागली आहे. 

एम्सच्या डेंटल विभागाचे डॉक्टर विजय माथूर आणि नितेश तिवारी यांनी ही माहिती दिली आहे. फोनमुळे दात तुटल्याच्या मुलांचे वय तीन ते आठ वर्षे होते. यापैकी सात मुले झोपून फोनवर गेम खेळत होते. यावेळी हा फोन त्यांच्या तोंडावर पडला आणि जखमा झाल्या. हॉस्पिटलमध्ये भरती झालेल्यांपैकी दोन जणांचे दात तुटले होते. तर काही जणांचे ओठ फाटले होते आणि दात हलले होते. 

यामुळे पालकांनी मुलांना मोबाईल देताना डोळ्यांसोबत आता दातांचीही काळजी घेणे गरजेचे बनले आहे. कारण मुलाचा चेहरा खराब झाल्यास भविष्यात कुरुपपणा येण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :Mobileमोबाइल