Call Recording: How To Know If Someone Is Recording Your Call | Call Recording: काय सांगता! तुमचा कॉल कोणीतरी रेकॉर्ड करतंय...जाणून घ्या कसं ओळखायचं?

Call Recording: काय सांगता! तुमचा कॉल कोणीतरी रेकॉर्ड करतंय...जाणून घ्या कसं ओळखायचं?

ठळक मुद्देविना परवानगी तुमचा कॉल रेकॉर्ड करणं हा एकप्रकारे गुन्हास्पीकरवर ठेवलेला व्हॉईस कॉल रेकॉर्ड करणं सगळ्यात सोप्पंकॉल रेकॉर्ड होतोय की नाही हे ओळखण्याचे अनेक पर्याय  

कॉल रेकॉर्डिंग(Call Recording) फिचर्स आजच्या काळात सर्वसामान्य झालं आहे, Android फोनमध्ये तर ही सुविधा सहजपणे उपलब्ध असते, अनेक मोबाईल कंपन्या त्यांच्या स्मार्टफोनमध्य ही सुविधा पहिल्यापासून इनबिल्ट देतात. तर त्या Android फोनमध्ये ही सुविधा नसेल त्यांना Google Play Store मध्ये अनेक Apps आहेत, ज्यामुळे कॉल रेकॉर्डिंग करणे सोप्पे जाते, आता आम्ही तुम्ही सांगणार आहोत की, तुमचा कॉल रेकॉर्डिंग होत असेल तर कसं जाणून घ्यायचं..

सर्वात महत्त्वाचं हे लक्षात असायला हवं की, कोणत्याही परवानगीशिवाय कॉल रेकॉर्ड करणं हा एकप्रकारचा गुन्हा आहे, कोणत्याही व्यक्तीशी बोलत असताना त्या व्यक्तीच्या नकळत कॉल रेकॉर्ड करणं हे कलम २१ च्या विरोधात आहे. म्हणजेच, प्रत्येक व्यक्तीच्या गोपनीयतेचा आदर केला पाहिजे. देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार घटनेच्या अनुच्छेद २१ अंतर्गत आयुष्यात मूलभूत हक्कांमधील गोपनीयतेचा अधिकार हा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. म्हणजेच, कोणत्याही व्यक्तीचा वैयक्तिक कॉल रेकॉर्ड करणे म्हणजे गोपनीयतेचा हक्क भंग करणे होय.

समजा, जर कोणी खासगी संभाषण करत असेल आणि त्याचा कॉल रेकॉर्ड झाला तर त्या व्यक्तीसाठी मोठा धोका असतो, त्यामुळे तुम्ही कॉलवर बोलतेवेळी कॉल रेकॉर्ड होतोय का, याकडे लक्ष ठेवणे गरजेचे आहे. जर तुम्हाला व्हॉईल कॉलवेळी असं लक्षात येईल की, काही संकेद अथवा मिनिट्सनंतर बीपचा आवाज येत आहे तर समजून घ्या तुमचा कॉल रेकॉर्ड होत आहे. नेहमी व्हॉईस कॉल सुरू असताना बीपचा आवाज येत असेल तर तुमचा कॉल रेकॉर्ड होण्याची शक्यता आहे.

कॉल रेकॉर्ड होतोय की नाही हे जाणून घेण्याचा दुसरा मार्ग म्हणजे, जर तुम्ही कोणाला कॉल केला आणि त्याने तुमचा कॉल स्पीकरवर टाकला तर समजून घ्या तुमचा कॉल रेकॉर्ड होत आहे, स्पीकरवर ठेवलेले व्हॉईस कॉल रेकॉर्ड होत असल्याचं समजणं खूप सोप्प आहे. अशातच जर तुमचा कोणावर विश्वास नसेल आणि तो स्पीकरवर तुमच्याशी बोलतोय तर तुम्हाला कॉल रेकॉर्ड होत असल्याचे संकेत मिळतील. तुम्ही कोणाशी फोनवर बोलताना दुसरा आवाज येत असेल तर ध्यानात घ्या कॉल रेकॉर्ड होतोय, अशा परिस्थितीत तुम्हाला मध्येमध्ये बाजूचा गोंधळ ऐकायला येईल, कॉल रेकॉर्ड होण्यापासून वाचण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्या. ऑनलाईन अनेक Apps आहेत, त्यात विना बीप आवाजाशिवाय कॉल रेकॉर्ड होतात, म्हणजे जर तुमचा कॉल रेकॉर्ड होत असेल तर त्यात कोणताही बीप आवाज येणार नाही.
 

Web Title: Call Recording: How To Know If Someone Is Recording Your Call

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.