2,800 पेक्षा कमी किंमतीत वॉटरप्रूफ Smartwatch; असे आहेत Ptron FORCE X11 चे फीचर्स
By सिद्धेश जाधव | Updated: January 17, 2022 17:13 IST2022-01-17T17:13:26+5:302022-01-17T17:13:36+5:30
Budget Smartwatch: Ptron FORCE X11 या बजेट फ्रेंडली स्मार्टवॉचमध्ये ब्लूटूथ कॉलिंग, SpO2 सेन्सर, हार्ट रेट मॉनिटर, असे फिचर मिळतात.

2,800 पेक्षा कमी किंमतीत वॉटरप्रूफ Smartwatch; असे आहेत Ptron FORCE X11 चे फीचर्स
Ptron या भारतीय ब्रँडनं स्मार्टवॉच सेगमेंटमध्ये प्रवेश केला आहे. कंपनीनं याची सुरुवात Ptron FORCE X11 हा बजेट फ्रेंडली स्मार्टवॉच सादर करून केली आहे. ज्यात ब्लूटूथ कॉलिंग, SpO2 सेन्सर, हार्ट रेट मॉनिटर, असे फिचर मिळतात. एवढे फीचर्स असूनही इतर स्मार्टवॉचच्या तुलनेत याची किंमत 2800 रुपयांच्या आत ठेवली आहे.
Ptron FORCE X11 ची किंमत
Ptron FORCE X11 स्मार्टवॉच अॅमेझॉन इंडियावरून विकत घेता येईल. कंपनीनं या स्मार्टवॉच किंमत 2,799 रुपये ठेवली आहे. सोबत कंपनी एक वर्षाची वॉरंटी देखील कंपनी देत आहे. हा नवीन स्मार्टवॉच दोन रंगात विकत घेता येईल. यासाठी कंपनीनं ओनिक्स ब्लॅक अँड स्वेड पिंक असे दोन पर्याय दिले आहेत.
Ptron FORCE X11 चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स
Ptron FORCE X11 मध्ये 1.7 इंचाचा चौरसाकृती एचडी कलर डिस्प्ले देण्यात आला आहे. जो क्रिस्प ग्राफिक आणि इम्प्लिफायड ब्राईटनेस देतो. यात ब्लूटूथ V5.1 चिपसेट आणि बिल्ट-इन मायक्रोफोनच्या माध्यमातून वायरलेस कॉलिंगची सुविधा मिळते. म्हणजे तुम्ही फक्त वॉचवरून लोकांशी बोलू शकता. यात इनकमिंग कॉल्ससाठी हॅन्ड्स-फ्री स्मार्ट नोटिफिकेशन्स, एसएमएस आणि सोशल मीडिया अलर्टची सुविधा आहे.
हा स्मार्टवॉच वॉटर रेजिस्टेंससाठी IP68 रेटिंगसह सादर करण्यात आला आहे. या स्मार्टवॉचमध्ये हार्ट रेट आणि ब्लड ऑक्सीजनची सतत ट्रॅकिंग केली जाते. तसेच यात फिटनेस आणि मेंटल हेल्थसाठी 7-अॅक्टिव्ह स्पोर्ट्स मोड देण्यात आले आहेत. सिंगल चार्जवर हा स्मार्टच 7 दिवस वापरता येतो. या स्मार्टवॉचमध्ये 24 तास तुमच्या शरीराची हालचाल मॉनिटर करतो. जी तुम्ही DaFit या अॅपवर बघू शकता.
हे देखील वाचा: