नववर्षानिमित्त BSNL ची खास ऑफर, 'या' प्लानमध्ये मोफत मिळतोय 100GB डेटा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 13:07 IST2025-12-25T13:07:26+5:302025-12-25T13:07:45+5:30
नाताळ आणि नववर्षाच्या निमित्ताने BSNL ने ही खास ऑफर आणली आहे.

नववर्षानिमित्त BSNL ची खास ऑफर, 'या' प्लानमध्ये मोफत मिळतोय 100GB डेटा
नाताळ आणि नववर्षाच्या निमित्ताने भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ने आपल्या कोट्यवधी ग्राहकांसाठी खास ऑफर्स जाहीर केल्या आहेत. कंपनीने BiTV प्रीपेड प्लानसोबत 100GB मोफत डेटा, तसेच काही निवडक प्रीपेड प्लान्समध्ये वाढीव डेली डेटा देण्याची घोषणा केली आहे. ही माहिती BSNL ने आपल्या अधिकृत X (ट्विटर) हँडलवरून दिली आहे.
BSNL BiTV प्लानचे खास फायदे
BSNL च्या BiTV प्लानची किंमत ₹251 आहे. या प्लानअंतर्गत ग्राहकांना 400 हून अधिक लाइव्ह टीव्ही चॅनेल्स (यात अनेक प्रीमियम चॅनेल्सचा समावेश), 23 पेक्षा जास्त OTT अॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन, ज्यात जिओ हॉटस्टार, सोनी लिव्ह यांचा समावेश आणि आता 100GB मोफत डेटा मिळतोय. हा खास ऑफर 24 डिसेंबर 2025 ते 31 जानेवारी 2026 या कालावधीत उपलब्ध असणार आहे.
Big data, bigger joy!
— BSNL India (@BSNLCorporate) December 24, 2025
Get 100 GB, unlimited calls, 30 days validity, and free #BiTV entertainment - all for ₹251 with #BSNLCarnivalPlan.
Keep your festive season uninterrupted!
Offer valid: 24th Dec 2025 to 31st Jan 2026
Recharge the smart way via #BReX now :… pic.twitter.com/3wSnYQ6dWT
नववर्षानिमित्त फ्री डेटा ऑफर
BSNL ने नववर्षाच्या पार्श्वभूमीवर आपल्या काही निवडक प्रीपेड प्लान्समध्येही अतिरिक्त डेटा देण्याचा निर्णय घेतला आहे.
या प्लान्समध्ये वाढीव डेली डेटा
STV 225, STV 347, STV 485 आणि PV 2399
₹225 चा प्लान
वैधता: 30 दिवस
डेली डेटा: आता 3GB (पूर्वी 2.5GB)
सुविधा: भारतभर अनलिमिटेड कॉलिंग, फ्री नॅशनल रोमिंग, दररोज 100 मोफत SMS
₹347, ₹485 आणि ₹2399 चे प्लान
डेली डेटा: 2GB ऐवजी आता 2.5GB
सुविधा: अनलिमिटेड कॉलिंग, फ्री नॅशनल रोमिंग, दररोज 100 मोफत SMS
वैधता अनुक्रमे: 50 दिवस, 72 दिवस आणि 365 दिवस
ग्राहकांसाठी मोठा फायदा
खासगी टेलिकॉम कंपन्यांशी स्पर्धा करत असताना BSNL ने दिलेले हे ऑफर्स डेटा, मनोरंजन आणि दीर्घ वैधता या तिन्ही बाबतीत ग्राहकांसाठी फायदेशीर ठरणारे आहेत. सणासुदीच्या काळात BSNL चे हे प्लान्स बजेटमध्ये जास्त सुविधा देणारे ठरू शकतात.