BSNL ची फ्रीडम ऑफर, 9 रुपयांत मिळणार कॉल-डेटा-SMS

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2018 15:53 IST2018-08-11T15:42:08+5:302018-08-11T15:53:31+5:30

BSNL ने आपल्या ग्राहकांसाठी स्वातंत्र्य दिनानिमित्त खास ऑफर आणली आहे. या ऑफरमध्ये प्रीपेड ग्राहकांना व्हॉइस आणि डेटा या सुविधांचा फायदा होणार आहे.

BSNL's Freedom offer, 9-rupee call-data-SMS | BSNL ची फ्रीडम ऑफर, 9 रुपयांत मिळणार कॉल-डेटा-SMS

BSNL ची फ्रीडम ऑफर, 9 रुपयांत मिळणार कॉल-डेटा-SMS

नवी दिल्ली : BSNL ने आपल्या ग्राहकांसाठी स्वातंत्र्य दिनानिमित्त खास ऑफर आणली आहे. या ऑफरमध्ये प्रीपेड ग्राहकांना व्हॉइस आणि डेटा या सुविधांचा फायदा होणार आहे. BSNL ने यामध्ये 9 आणि 29 रुपयांचा प्लॅन आणला आहे. हे दोन्ही प्लॅनला फ्रीडम ऑफर असे नाव दिले आहेत. 
9 रुपयांच्या फ्रीडम ऑफरमध्ये प्रीपेड ग्राहकांना अनलिमिटेड व्हाइस कॉल (दिल्ली आणि मुंबई सोडून), 2 GB डेटा, आणि 100 SMS दिले जाणार आहेत. यासोबत एफयूपीच्यानंतर डेटाचे स्पीड 80 Kbps होणार आहे. याचबरोबर, ही ऑफर फक्त एक दिवसांसाठी ठेवण्यात आली आहे. ग्राहकांना या ऑफरचा फायदा 10 ते 25 ऑगस्टपर्यंत घेता येणार आहे.  याशिवाय, 29 रुपयांच्या ऑफरमध्ये ग्राहकांना अनलिमिडेट व्हाइस कॉल (दिल्ली आणि मुंबई सोडून) दरदिवशी 2GB डेटा आणि 100 SMS ची सुविधा दिली जाणार आहे. यामध्ये एफयूपीच्यानंतर डेटाचे स्पीड 80 Kbps होणार आहे. तसेच, ऑफरची मर्यादा सात दिवसांची असणार आहे.  
दरम्यान, कंपनीने गेल्या काही दिवसांपूर्वी  27 रुपयांचा वीकली प्रीपेड प्लॅन लाँच केला होता. त्यात 1GB चा 2G आणि 3G डेटा मिळत आहे. यामध्येही 29 रुपयांच्या प्लॅनप्रमाणेच इतर सुविधा मिळत होत्या. याशिवाय कंपनीने आपल्या 399 रुपयांच्या पोस्टपेड प्लॅनमध्ये सुधारणा करुन रोज 100 SMS पाठविण्याची मुभा दिली आहे. आधी या प्लॅनमध्ये महिन्याला 100 SMS करता येत होते. याबरोबरच कंपनीने आपला 491, 186 आणि 171 रुपयांचे आकर्षक प्लॅन जाहीर केले आहेत.

Web Title: BSNL's Freedom offer, 9-rupee call-data-SMS